spot_img
अहमदनगररामा तराळसह झावरे, खिलारी अडकले जाळ्यात; वाळू तस्करीच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला...

रामा तराळसह झावरे, खिलारी अडकले जाळ्यात; वाळू तस्करीच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला प्रकरण

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
वासुंदे येथे वाळू तस्करीच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीच्या मुस्क्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. मुख्य आरोपी रामा तराळ यासह गणेश संपत झावरे व सिद्धार्थ खिलारीला पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या सर्व आरोपींना दुपारी उशीरा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे वाळू तस्करीच्या वादातून 14 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विशाल तळेकर या युवकावर टाकळी ढोकेश्वर परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी काठी, दांडके आणि गजाचा वापर करून तळेकर यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली होती. हा हल्ला वाळू तस्करीच्या वादातून घडल्याचे बोलले जात होते.

हल्ल्‌‍यात सहभागी असलेले टाकळी ढोकेश्वर येथील उपसरपंच रामा उर्फ किरण किसन तराळ, गणेश संपत झावरे, सिद्धार्थ खिलारी, अमोल अल्हाट आणि मुन्ना अल्हाट हे परिसरात गुन्हेगारी करत असल्याचे समोर आले आहे. हल्ल्‌‍यानंतरही आरोपी दोन दिवस मोकाट फिरत होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. 15 ऑगस्ट रोजी अमोल अल्हाट याला अटक झाली. परंतु इतर आरोपी परिसरातच फिरत असल्याची माहिती होती.नगर सह्याद्रीने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर पारनेर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी रामा उर्फ किरण किसन तराळ याला मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी टाकळी ढोकेश्वर येथून अटक केली. विशाल तळेकर यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

बेड्या पडताच रामा तराळच्या छातीत दुखू लागले
दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झालेल्या मुख्य आरोपी रामा तराळ याला पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी टाकळी चौकातच बेड्या ठोकल्या. यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पारनेरच्या सरकारी रुग्णालयात नेले असता त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर डॉक्टरांनी त्यास दाखल करून घेतले.

पारनेरच्या रुग्णालयात मलिदा घेऊन दिले जाते सटफिकेट!
गेल्या काही महिन्यात गंभीर गुन्ह्यात कोणत्याही आरोपीला अटक केली असता त्यातील बहुतांश जणांना वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली दाखल करून घेण्यासाठी मोठी बिदागी घेऊन तसे सटफिकेट पारनेरच्या या रुग्णालयातून देण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यासाठी एक टोळीच कार्यरत असल्याचेही लपून राहिलेले नाही. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासह गेल्या सात- आठ महिन्यात या रुग्णालयाने अशाप्रकारे दिलेल्या दाखल्यांची चौकशी करण्याची मागणी आता नागरीकांमधून होत आहे.

भविष्यातील घटना टाळण्यासाठी वचक आवश्यक
वासुंदे गावामध्ये युवकाला गुंडांकडून झालेली मारहाण हा घडलेला प्रकार गावकऱ्यांसाठी धक्कादायक आहे. यापूव असा प्रकार घडला नाही. या घटनेच्या विरोधात वासुंदेकर गावकऱ्यांनी जी एकजूट दाखवली. त्यामुळेच या अपप्रवृत्तीला लगाम बसू शकला. अशा घटना परिसरामध्ये या पुढील काळात घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने यावर वचक बसवावा.
-सुजित झावरे पाटील (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद)

पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारीला बसेल आळा
वासुंदे येथील युवकावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी अटक करून तत्परता दाखविल्यामुळे पारनेर पोलीस प्रशासनाच्या कारवाईने टाकळी ढोकेश्वर परिसरामध्ये वाळू तस्करी तसेच अवैध धंद्यांना आळा बसेल. वाढलेल्या गुन्हेगारीला आळा बसेल. अशी अपेक्षा सर्वसामान्य ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार; अमित शाहांनी मांडली तीन विधेयके

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत तीन महत्त्वाची...

शनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय, शनी अमावस्येला ‘या’ ठिकाणी भाविकांना प्रवेशबंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनिशिंगणापूर येथील शनिदेव मंदिरात दरवर्षी शनी अमावास्येला लाखो भाविक दर्शनासाठी...

टेलेंम नसल्याने कचरा गाडीचा अपघात; जखमी लोखंडे यांची मोठी मागणी

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव रोड चौकात मंगळवारी सकाळी ८ वाजता घडलेल्या...

खंडणीखोरांचा बंदोबस्त करा; कोणी केली मागणी?

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सामंत यांची भेट अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर एमआयडीसीतील एक्साइड कंपनीच्या कच्च्या...