spot_img
अहमदनगरनालेगावात राडा; महिलेला मारहाण, शहरातील रांगोळी प्रकरण तापले; ३० जणांना ३ ऑक्टोबरपर्यंत...

नालेगावात राडा; महिलेला मारहाण, शहरातील रांगोळी प्रकरण तापले; ३० जणांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात रांगोळीच्या वादातून निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीला सोमवारी हिंसक वळण लागले. महामार्गावर रास्तारोको दरम्यान झालेल्या दगडफेक व तोडफोड प्रकरणी तोफखाना पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ३० जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी दुपारी सुरू झालेल्या रास्तारोकोमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही आंदोलकांकडून दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दिवसभरात ३६ जणांना ताब्यात घेतले, त्यामध्ये ६ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आतापर्यंत एकूण ३९ आरोपींची ओळख पटली असून, सुमारे १४० ते १६० अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या ३० आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व तपास अधिकारी गणेश वारुळे यांनी, सदर गुन्ह्याचा सखोल तपास, तसेच फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी न्यायालयासमोर केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत ३० जणांना ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच पुढील अटक अपेक्षित असल्याचे निरीक्षक कोकरे यांनी सांगितले. घटनेनंतर कोठला परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

३८ वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू
शहरातील स्टेशन रोड परिसरातून पायी जात असलेल्या एका ३८ वर्षीय तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी उघडकीस आली. निलेश महेंद्र पोखरणा (वय-३८, रा. आगरकर मळा, स्टेशन रोड, अहिल्यानगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.निलेश पोखरणा हे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हॉटेल यश ग्रँड समोरून पायी जात होते. यावेळी झालेल्या रस्ते अपघातामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोल्हे यांनी या घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना दिली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नालेगावात राडा; महिलेला मारहाण
चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
शहरातील नालेगाव परिसरातील वारुळाचा मारुती परिसरात मुलांच्या खेळण्याच्या किरकोळ कारणावरून एका महिलेला मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हिना आझाद शेख (वय ३०, रा. वारुळाचा मारुती वसाहत) यांनी फिर्याद दिली. मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांची मुले घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या सोनाली चव्हाण हिने मुलांना शिवीगाळ केली. यावरून वाद झाला. वाद वाढत गेला. फिर्यादी हिना शेख यांना सोनाली चव्हाण, रेखा चव्हाण, प्रियंका चव्हाण व राहुल चव्हाण या चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आह

सोशल मीडियाचा गैरवापर; इंस्टाग्रामवर तरुणाची बदनामी
कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल
इंस्टाग्रामवर एका तरुणाचा फोटो वापरून आक्षेपार्ह स्टिकर्स आणि अश्लील भाषेचा वापर करत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे कोतवाली पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अनिकेत बाबासाहेब रासकर (वय २३, रा. माळीवाडा, बारातोटी कारंजा, अहमदनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यांचा चुलत भाऊ संग्राम आसाराम रासकर याच्या इंस्टाग्रामवरील फोटोवरून वादाची सुरूवात झाली. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास zain६०६० आणि abu0087 या इंस्टाग्राम अकाउंट्सवरून संग्राम रासकर यांच्या फोटोवर मांजरीचे आणि बुटांचे स्टिकर्स लावण्यात आले. त्यासोबतचअपमानास्पद मजकूर लिहून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. इतक्यावरच न थांबता, संबंधित तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्यात अबुसलेमन इम्रान सय्यद, समीर राजू सय्यद (वय २३, रा. केडगाव वेस जवळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कायद्याचे रक्षकच बनले भक्षक! आईच्या डोळ्यासमोर मुलीवर पोलिसांचा अत्याचार

Crime News : कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आंध्र प्रदेशातील...

कोठल्यातील ती घटना ‌‘फक्त ट्रेलर‌’; ‌‘पिक्चर‌’ अभी बाकी!

वाढता जातीय तणाव नक्की कोणाला अभिप्रेत आहे? प्रशासनाला की राजकारण्यांना? नगरकरांच्या मानगुटीवर जातीय दंगलीचे...

… हे तर माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र; सुजित झावरे पाटलांनी स्पष्ट शब्दात मांडले मत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्यात झावरे यांना डावलले पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...

स्वतः ट्रक्टर चालवत सभापती राम शिंदे शेतकऱ्याच्या बांधावर! अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी, काय म्हणाले पहा..

कर्जत | नगर सह्याद्री जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये मोठे नुकसान...