spot_img
अहमदनगरराळेगणसिद्धीला पुरस्कार सोहळा पुढे ढकलला; समाजसेवक अण्णा हजारे यांचा निर्णय

राळेगणसिद्धीला पुरस्कार सोहळा पुढे ढकलला; समाजसेवक अण्णा हजारे यांचा निर्णय

spot_img

राळेगणसिद्धी । नगर सहयाद्री
अहमदाबाद येथे १२ जून २०२५ रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात २६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यंदा १५ जून रोजी होणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १६ जूनला नियोजित सामाजिक सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली.

त्यांनी दिलेल्या पत्रकात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये भूकंपानंतर केंद्र सरकारच्या नियोजन आयोगावर काम करत असताना मी अहमदाबादमध्ये सुमारे सहा महिने वास्तव्य केले होते आणि संपूर्ण गुजरात राज्यात फिरलो होतो. त्या शहराशी असलेल्या भावनिक संबंधामुळे १५ जून रोजी होणारा वाढदिवस साजरा करू नये असे अहवाना त्यांनी केले आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे देखील या अपघातात निधन झाले आहे.अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणारा सामाजिक सेवा पुरस्कार सोहळा देखील पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो,असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर: शिक्षक बनला भक्षक! जिल्हा परिषद शाळेत चिमकुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार्‍या परप्रांतीय...

पोलीस दलात मोठे फेरबदल; अमोल भारती शिर्डीचे उपअधीक्षक, अहिल्यानगरला…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री राज्य शासनाच्या गृह विभागाने केलेल्या बदल्यामध्ये अहिल्यानगर शहर, श्रीरामपूर व...

आजचे राशी भविष्य! चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका - अन्यथा नंतर...

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...