spot_img
मनोरंजनराखी सावंत तिसऱ्यांदा अडकणार बंधनात!; कुणाशी थाटणार संसार?

राखी सावंत तिसऱ्यांदा अडकणार बंधनात!; कुणाशी थाटणार संसार?

spot_img

Rakhi Sawant: बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत राहणारी आणि आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली राखी सावंत वयाच्या 46 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत बोलत असताना राखी सावंतने तिच्या लग्नाविषयी माहिती दिली. राखी सावंतचा होणारा नवरा हा पाकिस्तानात पोलीस अधिकारी आहे. त्याचे नाव दोडी खान असून तो अभिनेता देखील आहे. “मला लग्नासाठी अनेक प्रस्ताव येत होते. मात्र, मला माझे खरे प्रेम पाकिस्तानमध्ये मिळाले आहे. दोडी खान हा माझा प्रियकर आहे. लवकरच आम्ही लग्न करणार आहोत, असे राखीने सांगितले.

पाकिस्तानात इस्लामिक रितीरिवाजानुसार त्यांचे लग्न होणार आहे. लग्नाची रिसेप्शन पार्टी भारतात असेल. तर, हनिमूनसाठी ते स्वित्झर्लंड किंवा नेदरलँडला जाणार आहेत. लग्नानंतर ते दुबईत राहणार असल्याचेही राखीने सांगितले. 2019 मध्ये राखीने एनआरआय रितेशशी लग्न केल्याची माहिती आहे. मात्र, 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने आदिल खान दुर्रानी याच्यासह लग्न केले. आदिलसोबत लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. तिने तिचे नाव बदलून राखी सावंत फातिमा ठेवल्याचा दावा करण्यात आला होता.

आदिलने सुरुवातीला नकार दिला असला तरी नंतर राखीसोबतचे लग्न मान्य केले. राखीने 2023 मध्ये मक्का येथे पहिला उमराह केला होता. मात्र, आदिलशीही तिचा घटस्फोट झाला. राखीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आदिलने सोमी खानशी लग्न केले. राखी सावंतच्या या तिसऱ्या लग्नाची बातमी कितपत खरी आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे पब्लिसिटी स्टंट आहे की आणखी काही, हे येणारा काळच ठरवेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...