spot_img
अहमदनगरसुप्यासह पारनेरमध्ये राजाश्रीत गुन्हेगारी!; पोलिसांचा वचक संपला...

सुप्यासह पारनेरमध्ये राजाश्रीत गुन्हेगारी!; पोलिसांचा वचक संपला…

spot_img

गुन्हेगारांना पाठबळ देणारी खाकीची मानसिकता
पारनेर | नगर सह्याद्री
सुपा औद्योगिक वसाहतीत एका उद्योजकाला मारहाण करण्यात आली. ही मारहाण कामगारांच्या पळवापळवीतून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मारहाण कशातून झाली याहीपेक्षा ती ज्यापद्धतीने झाली आणि घटनेचा व्हिडीओ पाहता सुपा औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण पारनेर तालुक्यात कायद्याचा धाकच संपला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुपा औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण तालुक्यात गुन्हेगारी वाढली असून ती संपूर्णत: राजाश्रीत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. काही ठिकाणी राजकारण्यांचा तर काही ठिकाणी पोलिसांचा आश्रय गुन्हेगारांना मिळत असल्याने या तालुक्यातील पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना बदल्याची मागणी सामाजिक संघटनांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्फत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यकडे केली आहे.

सुपा औद्योगिक वसाहतीत कामगार पळवापळवीच्या वादातून दिनेश उरमुडे या उद्योजकाला पाच ते सहा जणांनी लाकडी दांडयाने मारहाण केली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याबाबतचा व्हिडीओ पाहता गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचेच स्पष्टपणे समोर आले आहे. या घटनेतील जखमी शुभम इंजिनिअर कंपनीचे मालक उद्योजक दिनेश प्रमोद उरमुडे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेतील गुन्हेगार आरोपी नगर तालुक्यातील भोयरेपठार आणि पिंपळगाव कौडा या गावचे रहिवाशी आहेत.

या आरोपींना पारनेर तालुक्यातील एका मोठ्या नेत्याचे आशिर्वाद आहेत. नेत्याच्याच आशीर्वादाने आणि सहकार्याने यापूर्वीही याच औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योजकांना दिवसाढवळ्या याहीपेक्षा भयंकर अशी मारहाण करण्यात आली. मात्र, पोलिसांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. या प्रकरणात देखील सुपा पोलिस ठाण्यातून कोणतीही ठोस भूमिका घेतली जाणार नाही. कारण, पोलिस अधिकारी हे नेत्यांच्या दावणीला बांधले असल्याची चर्चा आता सुपा गावासह औद्योगिक वसाहतीत जाहीरपणे झडू लागली आहे.

टाकळीं ढोकेश्वर पोलिस स्टेशनसाठी
आ. काशिनाथ दाते लक्ष घालणार का?
तालुक्याचे वाढलेले भौगोलिक क्षेत्र आणि वाढती गुन्हेगारी याचा विचार करता सुपा येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन कार्यन्वीत करण्यात आले. याचवेळी टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलिस स्टेशनचा प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजूरी दिली. यानंतर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयातून त्याचे संपूर्ण सोपस्कर पार पडले. यासाठी आवश्यक असणारी इमारत आणि कर्मचारी निवासस्थानेही तयार करण्यात आली. मात्र, असे असतानाही टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन अद्यापही कार्यन्वीत का करण्यात आले नाही असा प्रश्न आहे. याबाबत आता नव्यानेच आमदार झालेल्या काशिनाथ दाते यांनी लक्ष घालावे आणि हे पोलिस स्टेशन कार्यन्वीत करावे अशी मागणी या परिसरातील गावांमधून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बदनामी करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार; कुठे घडला प्रकार आणि कोण आहे आरोपी…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बदनामी करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर...

शेवगाव, पाथर्डीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे शाखेकडून नऊ गुन्ह्याची उकल

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : शेवगाव, पाथर्डी तालुक्यात घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

निवडणूक संपली; ताबेमारी सुरू, टोळ्यांचा म्होरक्या कोण?

नगर शहरात कायद्याचा नव्हे, काय द्यायचा धाक अहिल्यानगर | नगर सह्याद्री मोकळा भूखंड दिसला की त्यावर...

श्रीगोंद्यात अवैध धंदे जोरात!; अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने हप्तेखोरी वाढली | गुन्हेगारांसह कमीशन वाल्यांचा अड्डा!

श्रीगोंदा | नगर सह्याद्री गुन्हेगारांसह अवैध धंद्यांचे माहेरघर अशी ओळख अशी नवी ओळख श्रीगोंदा शहराची...