spot_img
ब्रेकिंगराज-उद्धव युती! महाराष्ट्रात नव्या समीकरणाची नांदी? राज्यात चर्चेला उधाण..

राज-उद्धव युती! महाराष्ट्रात नव्या समीकरणाची नांदी? राज्यात चर्चेला उधाण..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? हा सवाल गेल्या दशकभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात विचारला जातोय. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं, त्यानंतर अनेकांनी ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. याच युतीसाठी आता राज ठाकरेंनी टाळी दिल्याचे दिसतेय.

महेश मांजरेकर यांच्या मवास्तव में ढीींहफ या व्हिडिओ पॉडकॉस्टमध्ये राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला. आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापेक्षा वाद आणि भांडणे खूप छोटी आहेत, असे म्हणत राज ठाकरेंकडून शिवसेनेला एकप्रकारे प्रस्ताव दिला आहे. यावर उद्धव ठाकरेंकडून काय प्रतिक्रिया येतेय, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चुकीचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला आहे. आमच्यातील वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यासाठी एकत्र यायला हरकत नाही, असे राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार कठीण नाही
शिवसेना फुटली किंवा नाही फुटली, तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे म्हणाले, विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या स्वार्थाचा विषय नाही. कुठल्याही गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं किरकोळ आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी बाकी सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार कठीण आहे, असं मला वाटत नाही. माझ्या इच्छेचा आणि स्वार्थाचा प्रश्न नाही.

मीही भांडण बाजूला ठेवायला तयार; उद्धव ठाकरे
किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा,आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही, हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्यात भांडण नव्हतंच, पण तरीही आमच्यातील भांडणं मिटवून टाकल्याचं मी जाहीर करतो. त्यावेळेला सर्व मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर यायचं. मग काय द्यायचाय त्या तो पाठिंबा बिनशर्त द्या. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्थ माझी आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांनंतर खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मांडलेली मांडलेली भूमिका हिताची आहे, आणि आमची भूमिका देखील हिताची आहे. राज ठाकरेंचं वक्तव्य मी आणि उद्धव ठाकरेंनी ऐकलंय. आम्ही सकारात्मक भूमिकेतून याकडे पाहतोय. माझी उद्धव ठाकरेंसोबत आज सकाळी आणि काल रात्री देखील चर्चा केली. आम्ही हवेत बोलत नाहीय, महाराष्ट्र आणि मुंबईच्या मराठी माणसाच्या हितासाठी आम्हाला एकत्र यावच लागेल, असं म्हणत संजय राऊत यांनी देखील सकारात्मक भूमिका दाखवली आहे. आम्ही राज ठाकरेंची वाट पाहू. राज ठाकरेंकडून रिप्लाय आला तर, आम्ही तो नाकारण्याचा करंटेपणा करणार नाहीत. सर्व शिवसैनिक आणि सर्व ठाकरे एकच आहेत. व्यक्तिगतरित्या आम्ही जवळ आहोत, राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे भाऊ आहेत हे तुम्ही मान्य करा. राज ठाकरेंनी आता मन मोकळं केलंय. त्यांची आणि आमची रक्ताची नाती आहेत.

महाराष्ट्र संस्कृतीला अशी अभद्र युती मान्य नव्हती
राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी होकार दिला आहे. पण एक अट ठेवली आहे. असं असताना आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरे हे महायुतीमधून बाहेर गेले होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार आणि काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होतं. ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं, महाराष्ट्र संस्कृतीला अशी अभद्र युती मान्य नव्हती. उद्धव ठाकरेंचे जे सरकार आलं होतं, ते अनैसर्गिक होतं. नैसर्गिक सरकार हे भाजप-सेना युतीचे होते. आता तसेच सरकार आले आहे. तेव्हाही आपलं बहुमत होतं. भाजप आणि सेना एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं. आता तो काळ गेला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

राज ठाकरेंची भूमिका जुनीच
मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरे यांनी जी भूमिका आज घेतलेली आहे, ती काही नवीन नाही. यापूर्वीही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती, आणि त्यावेळी ते म्हणाले होते की, एका हाताने टाळी वाजत नाही, त्यांच्या मागच्या प्रस्तावाचे काय झाले? तोच अनुभव त्यांना याही वेळी येईल’, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहे.

काय म्हणाले चंदू वैद्य ?
मामा चंदू वैद्य म्हणाले मी पहिल्यापासून सांगतोय, दोघे जेव्हा एकत्र येतील तो दिवस राज्यासाठी सुवर्ण दिवस असेल. बाळासाहेब असतानाही मी प्रयत्न केले, परंतु त्यावेळी माझ्या प्रयत्नांना यश आले नाही. आजही माझी इच्छा, दोघांनीही एकत्र यावे, मतभेद विसरून काम करावे, असे म्हणाले. ज्या भावनिक किंवा राजकीय कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा आला तो मिटलाय का? असे चंदूमामांना विचारले असता, जगात अशक्य गोष्ट काहीही नसते. शेवटी मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे. तोडा फोडा आणि राज्य करा या नीतीला आळा घालायचा असेल तर दोघांनीही एकत्र यायला पाहिजे. तरच मराठी माणूस आणि महाराष्ट्र पुढे जाईल, असे चंदूमामा म्हणाले. तसेच खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील? असे विचारले असता ते म्हणाले व्हायला कारण आणि न व्हायला उपाय.. अशी गोष्ट आमची आई सांगायची. त्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त राज बोलला तसं इच्छा पाहिजे. दोघांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे. कालाय तस्म्ये नम: म्हणतात… शेवटी काळ काही गोष्ट ठरवत असतो. शेवटी गरज ही सगळ्यांना असते. महत्त्वाचं म्हणजे मराठी माणूस आणि महाराष्ट्राला गरज आहे. मी दोघांनाही शुभेच्छा देतो.

राज आणि उद्धव दोघे दूर का गेले होते?
राज आणि उद्धव (Thackeray Brothers) वेगळे का झाले होते? याबाबद्दल चंदू मामांना विचारले असता मी लवकरच छोटं पुस्तक लिहिणार आहे. यात सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणार आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचे ज्यावेळी उद्घाटन होईल त्यावेळी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...

ग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शकीला पठाण...