मुंबई। नगर सहयाद्री:
महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेचे नेते माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांनी खळबळजनक आरोप केला आहे. आम्ही कणकवलीला चाललो होतो त्यावेळेला आम्हाला पोलीस अधिकार्यांनी सांगितलं की, तुम्ही रस्ता बदला… राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्लॅन होता, आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि राज साहेबांच्या माहितीप्रमाणे तो प्लॅन उद्धव ठाकरे यांनीच केला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट रामदास कदम यांनी एका मुलाखतीत केला आहे.
राज उद्धव ठाकरेंच्या संघर्षाची रामदास कदमांनी चिरफाड करण्याचा प्रयत्न आपल्या मुलाखतीमधून केला आहे. राज ठाकरेंना जीवे मारण्याचा डाव कुणाचा होता? असा सवाल उपस्थित करत कदमांनी एकप्रकारे गौप्यस्फोटच केला आहे. कणकवलीत राज ठाकरेंसोबत काय घडणार होतं ? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं हितं कसं होणार? राज-उद्धवच्या युतीत कुणाचा बळी जाईल? आदी प्रश्नांची स्फोटक उत्तरे कदम यांनी आपल्या मुलाखतीतून दिली आहेत.
ते या मुलाखतीत म्हणाले, मी राज ठाकरे यांचा फॅन आहे. उद्धव ठाकरेला बरोबर घेतल्यानंतर महाराष्ट्राचे भलं तुम्ही काय करणार आहात ते एकदा सांगा राज ठाकरे साहेब तुमच्या जवळचा मित्र म्हणून तुम्हाला विचारतो तुमचा चाहता म्हणून जवळचा तुम्हाला विचारतो असं म्हणत आज उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन राज ठाकरे यांच्या मागे पडला आहे अशा एकेरी शब्दात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख रामदास कदम यांनी केला आहे.