मुंबई। नगर सहयाद्री:-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्याची प्रतिक्षा आहे. पण ही प्रतिक्षा आता संपली असून लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलीय. या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असं महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील पैसे जमा झाले की नाही चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करावी लागेल. त्यावरुन तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही,.