spot_img
ब्रेकिंगबदलापूर घटनेवरून राज ठाकरे संतापले, कार्यकर्त्यांना दिल्या थेट सूचना

बदलापूर घटनेवरून राज ठाकरे संतापले, कार्यकर्त्यांना दिल्या थेट सूचना

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुंबईतील या घटनेचेथेट दिल्लीत पडसाद उमटताना दिसत आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय बालक आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून एक पथक बदलापूरला पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने सांगितले आहे.

सध्या बदलापूरच्या नागरिकांनी रेल्वे स्थानकावर ठिय्या देत रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आहे. गेल्या अनेक तासांपासून रेल्वे सेवा ठप्प आहे. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. मनसे सैनिकांना देखील हा मुद्दा लावून धरला असं सांगितलं आहे.

राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?

बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या…

— Raj Thackeray (@RajThackeray) August 20, 2024

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या…’ अशी सूचना राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...