अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राज्यात ठिकठिकाणी येत्या 21 जुलैपर्यंत मेघगर्जनेसह, व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. नगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल असे या केंद्राने म्हटले आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस येईल असेही सांगण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, विदर्भातील अकोला, अमरावती, कोकणातील सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
काही ठिकाणी सोसाट्याचे वारेही वाहतील. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांत मात्र 18 तारखेपासून 21 तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. या काळात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटही अनुभवाला येईल असे म्हटले आहे.