spot_img
ब्रेकिंगRain update: नगरमध्ये जोर'धारा'! राज्यात कुठे-कुठे पाऊस; पाहा ताजे अपडेट्स एका क्लिकवर..

Rain update: नगरमध्ये जोर’धारा’! राज्यात कुठे-कुठे पाऊस; पाहा ताजे अपडेट्स एका क्लिकवर..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून हा राज्यात सक्रिय होतांना दिसत आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज आज खरा ठरला अन काल नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने सलामी दिली. अवकाळी पावसामुळे मात्र फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. निसर्गाचा हा कोप नेमका थांबणार तरी कधी, याची वाट शेतकरी पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे.

हवामान खात्याने सांगितले आहे की, राज्यात शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीसह, विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे.

तसेच रविवारी चंद्रपूर, पुणे, लातूर, नांदेड सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरात देखील अवकाळी पावसाच्या सरी बरसतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

नगर जिल्ह्यात जोर’धारा’!
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव,तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यात अनेक भागात झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. नगर शहरात सुमारे तासभर दमदार अवकाळी पाऊस बरसला. पारनेर तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह आवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडली होती. सायंकाळी देखील वाऱ्यासह रिमझीम पावसाने हजेरी लावल्यामुळे दिवसभराच्या उकाड्यापासून नागरीकांना काहिशी सुटका मिळाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...