spot_img
ब्रेकिंगकर्जुले हर्या, कासारेत ढगफुटीसदृश पाऊस; पहा, कुठे काय घडलं?

कर्जुले हर्या, कासारेत ढगफुटीसदृश पाऊस; पहा, कुठे काय घडलं?

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या आणि कासारे परिसरात रविवारी दि. 8 जून रोजी सायंकाळी ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. या अचानक आलेल्या पावसाने नाले-ओढे तुडुंब भरून वाहू लागले, तर परिसरात पाणीच पाणी झाले.

जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. पेरणी केलेल्या पिकांना पावसाचा मोठा फायदा होणार आहे. मात्र, साठवणूक केलेल्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंताही पसरली आहे. या पावसाने काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकही अडचणीची ठरत होती. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

शेतकऱ्यांनी कांदा आणि इतर पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले असले, तरी पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने खरिपाच्या पिकांसाठी दिलासा मिळाला आहे. नुकसान झालेल्या पिकांना नुकसान भरपाई म्हणून प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पीओपी गणेश मूर्तींबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; ‘ही’ अट ठेवली कायम

मुंबई / नगर सह्याद्री : प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मूर्ती विरुद्ध शाडूच्या मूर्ती...

अतिवृष्टीमुळे नुकसान; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे विधान…

  नैसर्गिक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे / राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाव...

विकासकामांच्या माध्यमातून केडगावला नवी दिशा दिली:आ. जगताप

लिंक रोड परिसरातील सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन व वृक्षारोपण अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- केडगाव हे शहराचे सर्वात...

‌‘गोरेश्वर‌’साठी 48 टक्के मतदान! बाबासाहेब तांबे की बाजीराव पानमंद?, निकालाकडे पारनेरकरांचे लक्ष

पारनेर | नगर सह्याद्री गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025 चे मतदान...