spot_img
अहमदनगरपुढील चार दिवस जिल्ह्यात पाऊस! वाचा हवामान खात्याचा इशारा एका क्लिकवर..

पुढील चार दिवस जिल्ह्यात पाऊस! वाचा हवामान खात्याचा इशारा एका क्लिकवर..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने अहमदनगरच्या दक्षिण भागात दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. तसेच पुढील चार दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार यंदा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. बि बियाणांसाठी शेतकर्‍यांची कृषी सेवा केंद्रांमध्ये लगभग दिसून येत आहे.

पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आता पुन्हा हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सांगितला आहे. त्यामुळे होणार्‍या पावसामुळे शेतकर्‍यांना पुन्हा दिलासा मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...