पुणे | नगर सह्याद्री
देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थती आहे. अनेक भागात अवकाळी पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही देशातील काही भागासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात आज अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील या भागात मुसळधार पावसाची शयातहवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये सोसाट्याच्या वार्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच रविवारपर्यंत जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये, तर रविवारी हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी आंबाच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात झाडावरील आंबे वादळी वार्यामुळं आणि पावसामुळं खाली पडले आहेत. तर दुसरीकडं लिंबू आणि भाजीपाला पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. यामध्ये वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी त्यांच्या कामांचे योग्य ते नियोजन करावं जेणेकरुन वादळी पावसाचा फटका बसणार नाही. तसेच नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.