spot_img
ब्रेकिंगजुगार अड्ड्यांवर छापेमारी!, नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यांवर छापेमारी!, नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

spot_img
अहिल्यानगर | नगर सह्याद्री 
शहरात दोन ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 31 जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 9 लाख 17 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथक तयार करुन जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई केली जात आहे. 
शहरातील कल्याण रोड परिसरात हॉटेल दिनेशच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून 17 जणांना रंगेहाथ अटक केली. पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, लोखंडी जिन्याच्या मागील बाजूस एका बंदिस्त जागेत ‌’तिरट‌’ नावाचा जुगार सुरु असल्याचे निदर्शनास आले. छाप्यावेळी लाखो रुपयांची रोकड, तीन पत्त्यांचे किट आणि अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले. जप्त रोकड रक्कम सुमारे 7 लाख 1 हजार 980 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर अड्डा नियमितपणे सुरू असून त्याठिकाणी नागरिकांकडून पैसे घेऊन जुगार खेळण्यास परवानगी दिली जात असल्याचे समोर आले आहे. पोलीस उपअधीक्षक खाडे यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरी कारवाई शहरातील अहमदनगर रेल्वेस्थानकाजवळील लोखंडी पुलाखाली सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून केली. या कारवाईत एकूण 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व वाहने मिळून सुमारे 2 लाख 15 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. आरोपींनी तिरट‌’ नावाचा हार-जीतीचा जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी 12 इसम आढळले, जे पैशावरून जुगार खेळताना सापडले. जप्त मुद्देमालात नगदी रक्कम, मोबाईल, दुचाकी व अन्य साहित्याचा समावेश आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही...

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:-  पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...