spot_img
अहमदनगर‘नगर’ मध्ये वेश्या व्यवसायावर छापा! ‘या’ लॉजमध्ये सुरु होता कुंटणखाना

‘नगर’ मध्ये वेश्या व्यवसायावर छापा! ‘या’ लॉजमध्ये सुरु होता कुंटणखाना

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
डांगे गल्ली येथील गुजराथी लॉजमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर कोतवाली पोलिसांनी 26 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापा टाकत लॉज चालकासह 7 जणांना ताब्यात घेतले. तसेच या ठिकाणी असलेल्या 3 महिलांची सुटका करण्यात आली.

माणिक चौकाजवळ असलेल्या डांगेगल्ली येथील गुजराथी लॉजमध्ये कुंटणखाना चालविण्यात येत असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथक नेमून कारवाईचे नियोजन केले.

मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी अगोदर तेथे बनावट ग्राहक पाठवण्यात आला. त्या बनावट ग्राहकाने तेथे जाऊन मावा खाऊन थुंकण्याच्या बहाण्याने पुन्हा बाहेर येऊन पोलिसांना इशारा केला.

त्याच्याकडून त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री होताच पोलिसांनी अचानक छापा टाकून काउंटरवर बसलेला इसम राजेंद्र प्रमोद अल्हाट (वय 43, रा. माधवनगर, केडगाव) यास ताब्यात घेतले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळूतस्करी

| देसवडे, मांडवे खुर्द, वासुंदे, पळशी परिसरात वाळूतस्करांचा उच्छाद | पोलिसांच्या नाकावर टिच्चून टाकळी...

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीला ‘अच्छे दिन’; आ. दाते यांच्या विजयानंत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश..

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी...

आडतेबाजारातील ‘ती’ कारवाई थांबवा; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, जुना दाणे डबरा, वंजार गल्ली, तपकीर...

सरपंच, उपसरपंचाला शिवीगाळ, ग्रामस्थावर प्राणघातक हल्ला; नगर तालुक्यातील ‘या’ गावात धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- घोसपुरी (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याच्या कामादरम्यान सरपंच किरण साळवे...