अहमदनगर। नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रीम येथे छापा टाकून श्रीगोंदा पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या ठिकाणावरून पीडित तीन महिलांची सुटका करण्यात आली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण रावसाहेब जरे (३९ नालेगाव, अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रीम येथे वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस कर्मचारी समीर सय्यद, ए. आर. काळे, छाया रांधवन, काळे यांनी दोन पंचांसह बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रीम येथे रविवारी (दि.१६) पहाटे अचानक छापा टाकून संशयित किरण रावसाहेब जरे
स्वतःच्या सा कायद्याकरिता या वेश्या करून देऊन कुंटनखाना चालवताना मिळून आला आहे. तसेच त्याचेकडून एकूण ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर छाप्यामध्ये तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आलेली आहे. जरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.