अहिल्यानगर | नगर सह्याद्री
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा टाकला. या छाप्यात दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुनिल आण्णासाहेब येळे (वय २८ वर्षे, रा. अंमळनेर, ता. नेवासा) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ राहुल व्दारके, पोना रिचर्ड गायकवाड, पोना सोमनाथ झांबरे, पोना बाळासाहेब नागरगोजे, पोकॉ रमीझराजा आतार, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ अमोल आजबे यांच्या पथकाने सोनई पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकला.
सोनई-नेवासा रोड लगत, अमळनेर गांवाच्या शिवारात, जोरे वस्ती येथे एक इसम विक्रीस प्रतिबंध असलेला मावा, सुंगधी तबाखू चोरुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी छापा टाकला असता सुनिल आण्णासाहेब येळे यांना ताब्यात घेवुन झडती घेतली.
तेथून सुंगधीत तंबाखु, सुंगधीत तयार मावा, मावा तयार करण्याची कच्ची सुपारी, सुंगधीत मावा तयार करण्याचे मशिन व वजनकाटा असे एकुण १ लाख ५४ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोकॉ अमोल श्रीरंग आजबे यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी व मुद्देमाल सोनई पो.स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.