spot_img
अहमदनगरमटका पेढीवर छापा! दोन ‌‘मटकाकिंग‌’सह ३५ जण अडकले जाळ्यात..

मटका पेढीवर छापा! दोन ‌‘मटकाकिंग‌’सह ३५ जण अडकले जाळ्यात..

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
गेल्या काही वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर अवैध व्यवसायांचे केंद्र बनत आहे. संगमनेर शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या मटका पेढीवर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत 10 लाख 46 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन ‌‘मटकाकिंग‌’सह 35 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईमुळे शहरातील मटका व्यावसायिकांमध्ये धाबे दणाणले आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामधील अवैध्य धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पोलिस पथक स्थापन करण्यात आले होते. मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने संगमनेर शहरातील तेलीखुंट आणि कोल्हेवाडी रोड या दोन ठिकाणी छापे टाकले. शहरातील तेलीखुंट चौक परिसरात मटक्याची पेढी सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकून 29 जणांना ताब्यात घेतले.

या कारवाईत त्यांच्याकडून 71 हजार 650 रुपये रोख, 2 लाख 29 हजारांचे मोबाईल, 4 लाख 35 हजार रुपयांच्या गाड्या व मटका साहित्य असा एकूण 7 लाख 35 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर कोल्हेवाडी रोड परिसरात सुरु असलेल्या मटक्याच्या पेढीवर छापा टाकला. छाप्यात 6 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 56 हजार 660 रुपये रोख, 1 लाख 12 हजारांचे मोबाईल, 1 लाख 42 हजारांच्या गाड्या व मटका साहित्य असा 3 लाख 10 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दोन्ही कारवायांमध्ये शंकर भागप्पा इटप, दत्तात्रय भांगप्पा इटप दोघे (रा. तेलीखुंट चौक, ता. संगमनेर), नानासाहेब बापू जाधव ( रा. रायते ता. संगमनेर), सुरज रामसिंग ताम्रकर (रा.पंपींग स्टेशन ता. संगमनेर), आण्णासाहेब कुंडलीक खताळ ( रा. धांदरफळ ता. संगमनेर), रविंद्र नंदराम फासे ( रा. माळीवाडा ता. संगमनेर), हाँसीराम रामभाऊ कहांडाळ (रा. सावरचोळ ता. संगमनेर), इकबाल बशीर शेख ( रा. गवंडी पुरा ता. संगमनेर), शेखर भास्कर जाधव ( रा. घुलेवाडी ता. संगमनेर), नानासाहेब भिमराज उंर्कीडे ( रा.निलवंडे ता. संगमनेर), रामदास गणपत माळी (रा. रायते ता. संगमनेर), केलास बाबूराव जाधव ( रा. खांडगाव ता. संगमनेर), शिवाजी दत्तू सातपुते (रा. कुरण रोड ता. संगमनेर), राजू रामनाथ झांबरे (रा. उपासणे गल्ली ता. संगमनेर), मधुकर नामदेव भोर (रा. घुलेवाडी ता. संगमनेर),बाळासाहेब कारभारी पवार ( रा. ओझर ता. संगमनेर), भाऊसाहेब नाना काळे (आनंदवाडी ता. संगमनेर), शंकर संजय सवारगे ( रा. वैद्यवाडी ता. संगमनेर), रमेश बाबूराव सरोदे ( रा. देवीगल्ली ता. संगमनेर), दगडू रामचंद्र पवार (रा. कनोली ता. संगमनेर), दत्तू तुकाराम अनाप (रा. कासारा दुमाला ता. संगमनेर), अस्लम सुलतान शेख ( रा.समनापूर ता. संगमनेर), हरिभाऊ बबन पवार (रा.निलवंडे ता. संगमनेर), मनोहर काशिनाथ अभंग ( रा. माताडे मळा ता. संगमनेर संभाजी किसन साळवे ( रा. निमगाव जाळी ता. संगमनेर), सुदर्शन दत्तात्रय इटप (रा. तेलीखुंट ता. संगमनेर), सोमनाथ शंकर यादव ( रा. कवठे कमळेश्वर ता. संगमनेर), विश्वनाथ नाना आल्हाट ( रा.पंपींग स्टेशन ता. संगमनेर), सुभाष सिताराम खैरे ( रा. जोर्वे ता. संगमनेर ) अशरफ समशेद सय्यद, हसनेन रॉफ पटेल, रियाज बाबुमियाँ देशमुख, नजाकत समशेद अली सय्यद, साहिल अशरफ जहाँगिरदार, आयान साजीद सय्यद, सर्व (रा. सय्यदबाबा चौक, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व प्रशांत खैरे, नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकातील पोसई/राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ/अजय साठे, पोहेकॉ अरविंद भिंगारदिवे, पोहेकों/मल्लिकार्जुन बनकर पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकों/सुनिल पवार, पोकों/सुनिल दिघे, पोकों/अमोल कांबळे, पोकों/जालिंदर दहिफळे यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाप्पा गणेशा, जरांगे पाटलांच्या जोडीने तुझंही स्वागत!

आयजी कराळे साहेब, वर्षभरापूर्वी तुमच्या डीजे बंदीला तुमच्याच अधिकाऱ्यांनी फाट्यावर मारले! कोण आवर घालणार...

शहर हादरलं! पोटच्या मुलाने आईला संपवलं, धक्कादायक कारण उजेडात..

Maharashtra Crime News: रएक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांतीनगर परिसरात मुलानेच स्वतःच्या आईची...

मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दणका, आरक्षणाबाबत सरकारने केली मोठी घोषणा

जालना | नगर सह्याद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले...

बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज; मंडळांची तयारी पूर्ण, पहा, फोटो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष रंगू लागला आहे. बाप्पाच्या...