spot_img
अहमदनगरकुंटणखान्यावर छापा; प्रतिष्ठित व्यक्तींवर गुन्हा, नेमकं काय घडलं पहा

कुंटणखान्यावर छापा; प्रतिष्ठित व्यक्तींवर गुन्हा, नेमकं काय घडलं पहा

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील राहुरी येथील न्यू भरत हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायात अडकलेल्या तीन महिलांची सुटका केली असून या संदर्भात पिटा कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी राहुरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, सारिका दरेकर, रणजीत जाधव यांचे पथक तयार करून ते अवैध धंद्यांची माहिती काढण्यास रवाना केले. पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना राहुरी-नगर रोडवरील न्यू भरत हॉटेल येथे एक इसम महिलांकरवी कुंटणखाना चालवीत असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाला मिळाली. पथकाने ही माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिली. त्यानंतर तपास पथक व संजय ठेंगे व पोलीस अंमलदार एकनाथ आव्हाड, विकास साळवे, जालिंदर साखरे यांचे संयुक्त पथक तयार करून ते छाप्यासाठी रवाना झाले.
तपास पथकाने न्यू भरत हॉटेल येथे खात्री करण्याकरिता पथकातील पोलीस अंमलदारास संध्याकाळी सहा वाजून २० मिनिटांनी बनावट ग्राहक म्हणून पाठविले.

तपास पथकास या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असण्याबाबत खात्री पटली. तेव्हा पंचांना घेऊन त्यांच्यासमोर हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा हॉटेलमध्ये विक्रम सुरेश विशनानी (वय-२७, रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी) यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून २० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व एक हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. विक्रम विशनानी याच्यासह हॉटेलची पाहणी केली असता पहिल्या मजल्यावरील रूममध्ये तीन महिला आढळून आल्या. त्या महिलांकडे विचारपूस केली असता त्यांनी आमच्याकडून वेश्या व्यवसाय करवून ग्राहकाकडून पैस घेतले जात होते. त्यातील काही पैसे आम्हास दिले जात असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने या तीन महिलांची सुटका केली आहे.

या छाप्यात पोलीस पथकाने विक्रम सुरेश विशनानी, फराद अहमद सय्यद (वय ३८, रा. राहुरी) हे आरोपी सापडले.या आरोपींविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका नारायण दरेकर, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...