spot_img
अहमदनगरहॉटेल राजयोगवर छापा! हॉटेलच्या आड 'तसला' धंदा? गुन्हा दाखल

हॉटेल राजयोगवर छापा! हॉटेलच्या आड ‘तसला’ धंदा? गुन्हा दाखल

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
शेवगाव ते गेवराई रस्त्यावरील हॉटेल राजयोगमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा व शेवगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करून दोन महिलांची सुटका केली. दोघांविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, ज्योती शिंदे, रणजीत जाधव यांचे पथक शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना शेवगाव ते गेवराई रस्त्यावर हॉटेल राजयोग येथे एक इसम महिलाकरवी वेश्या व्यवसाय (कुंटणखाना) चालवित असल्याची माहिती मिळाली.

पथकाने सदरची माहिती शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना दिली. त्यांच्यासह पोलीस अंमलदार प्रियंका शिरसाठ, किशोर पालवे यांना सोबत घेऊन संयुक्त पथकाने हटिल राजयोग येथे पथकातील पोलीस अंमलदाराला बनावट ग्राहक म्हणुन पाठविले. तपास पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर शासकीय पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकून अमर मारूती ढाकणे (वय २४, रा. हसनापूर, ता. शेवगाव) याला पकडले. त्याच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा २१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये दोन महिला मिळून आल्या त्यांची सुटका केली. त्यांनी आमच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची कबूली दिली. याप्रकरणी अमर ढाकणे याच्यासह हॉटेलचा मालक बाबासाहेब अंधारे (पुर्ण नाव नाही, रा. शेवगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ब्रेकिंग! नगरच्या राजकारणात ट्विस्ट!; सत्यजित तांबे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकिय चर्चांना उधाण…

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा...

अल्पवयीन मुलावर धारदार शस्राने सपासप वार!; बारातोंटी कारंजा जवळ नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तिघांनी अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार वस्तूने वार करून त्याला...

नगरचं राजकीय वातावरण फिरलं? ‘बडा’ नेता महायुतीची साथ सोडणार!

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आपल्या पहिल्याच यादीत...

परतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार! आज ‘या’ भागात मुसळधार

Maharashtra Rain Update राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान...