spot_img
ब्रेकिंगमावा तयार करणाऱ्या टोळीवर धाड!, माव्याचे नमुने तपासणीसाठी रवाना..

मावा तयार करणाऱ्या टोळीवर धाड!, माव्याचे नमुने तपासणीसाठी रवाना..

spot_img

पाच आरोपी अटकेत; चार लाखांचा मुद्देमाल जप्त
शेवगाव | नगर सह्याद्री
पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शेवगाव शहरात सुगंधित मावा तयार करून विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 3 लाख 98 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दिनांक 17 जून रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. परिक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, नाईकवाडी मोहल्ला, भगतसिंग चौक आणि बंधन लॉज जवळील परिसरात काही इसम सुगंधित मावा तयार करून विक्री करत आहेत.

खाडे यांच्या आदेशावरून पथकाने पाच ठिकाणी एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक केला. आरोपी खलील नबिक शहा, अल्ताफ पठाण, कुणाल संजय पिसाळ, शाहबाज ताहेर खान आणि आफताब ताहेर खान यांना अटक करण्यात आली. या ठिकाणाहून दोन ते पाच मशिन्स, सुगंधित तंबाखू, तयार मावा, आणि 100 ग्रॅम नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठवले आहेत.

मशिन्ससह जप्त मालामध्ये सुगंधित तंबाखू, मिश्रीत सुपारी व कच्चा माल यांचा समावेश आहे.या कारवाई दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शेवगाव परिसरातील अवैध मावा विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.या पथकात पोहेकॉ. पिपरदिवे, मोरे, चौधरी, विरकर, बनकर, खेडकर, पवार, कांबळे, भोसले, दिये, शिरसाठ, कारखिले यांचा समावेश होता. कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष सूचनेनुसार करण्यात आली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार मुसळधार!; ‘या’ पावसाचा हायअलर्ट, वाचा अंदाज..

मुंबई | प्रतिनिधी ऑगस्ट महिन्यात चांगली हजेरी लावणाऱ्या पावसाने आता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाची...

गणेश मंडपात गोळीबाराचा थरार!, भाजप आमदारच्या कुटूंबावर हल्ला; नेमकं काय घडलं?

Crime News: गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री सीतामढी जिल्ह्यातील परिहार परिसरात घडलेल्या एका भयंकर...

आजचे राशी भविष्य; ‘या’ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळणार..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका,...

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...