अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर-कल्याण रस्त्यावरील हॉटेल दिपाली येथे बिग बॉस नावाने अवैधरित्या सुरू असलेल्या र हुक्का बारवर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकला. बुधवारी (२ एप्रिल) दुपारी ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून त्याठिकाणी काम करणारा राज घनश्याम खाटीक (वय २०) व हुक्का पिणारा अभिषेक सुरेश खाटीक (वय २०, दोघे मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश, हल्ली रा. अहिल्यानगर) यांच्याविरूध्द – कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण रस्त्यावरील हॉटेल दिपाली येथील पत्र्याच्या शेडमध्ये बिग बॉस नावाने हुक्का बार सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक भारती यांना मिळाली होती. त्यांनी पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या.
पथकाने बुधवारी दुपारी सदर ठिकाणी छापा टाकून काचेचे हुक्का पॉट, चिलीम, हुक्का पाईप, तंबाखूजन्य पदार्थ असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचे हुक्का बार सुरज ग्यानाप्पा (रा. कोर्ट गल्ली, अहिल्यानगर) याच्या मालकीचे असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.