spot_img
अहमदनगरशिर्डीत कुंटणखान्यावर छापा ; पुढे काय घडलं पहा

शिर्डीत कुंटणखान्यावर छापा ; पुढे काय घडलं पहा

spot_img

शिर्डी | नगर सह्याद्री

शिर्डी शहरात मंगळवारी सायंकाळी दोन लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणार्‍या दोन हॉटेल मालक तसेच दोन मॅनेजर यांच्यावर पिटा अंतर्गत कारवाई करत दोन तरुणांसह ४ महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई केली आहे. शिर्डीतील अवैध गुन्हेगारी व वेश्या व्यवसाय मोडून समूह उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी शिर्डी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या हॉटेल सावता व हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस वर वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुप्त खबरीने शिर्डी पोलिसांना दिली. त्यानंतर ३ मे रोजी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एकाच वेळी दोन हॉटेलवर छापा मारला.

त्या ठिकाणी असलेल्या चार महिला व दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात दोन्ही हॉटेल मालक व मॅनेजर असे एकूण चार व्यक्तींवर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शिर्डी शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देह व्यापार चालत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांकडे केलेल्या होत्या.त्या तक्रारींच्या अनुषंगाने यापूर्वी देखील शिर्डी पोलिसांनी विविध लॉजवर छापे टाकून गुन्हे दाखल केले होते. यापूर्वी देखील गुन्हे दाखल असलेल्या देह व्यापार करणार्‍या महिला या दोन्ही लॉज मिळून होत्या. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - श्रीकृष्णनगर, केडगाव येथील प्लॉट क्रमांक ३० येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी...

धक्कादायक; बँक कर्मचार्‍याने १२ तोळे सोने लांबविले, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : नगरमध्ये बँक कर्मचार्‍यांने १२ तोळे सोने लंपास केल्याची प्रकार उघडकीस...

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...