spot_img
अहमदनगरमोठी बातमी: महाविकास आघाडी हायजॅक; राहुल जगताप यांचा 'तो' मुद्धा भावला

मोठी बातमी: महाविकास आघाडी हायजॅक; राहुल जगताप यांचा ‘तो’ मुद्धा भावला

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात विधानसभेची उमेदवारी न मिळालेले माजी आमदार राहुल जगताप यांच्या बद्दल संपूर्ण मतदारसंघात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. एकनिष्ठ राहिल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत सव्वाशे कोटींच्या पॅकेजला लाथ मारलेल्या स्वाभिमानी राहुल जगताप यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आता गावागावात दिसून येत आहे. दिपावलीच्या निमित्ताने घराघरात फराळाची चर्चा झडत असताना राहुल जगताप यांच्या स्वाभिमानाची चर्चा देखील झडत आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना मदत करण्याच्या बदल्यात कुकडी कारखान्यासाठी 138 कोटी रुपयांचे पॅकेज मिळत असताना त्याला झिडकारुन राहुल जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. जगताप यांच्या प्रामाणिक भूमिकेतून लंके यांना श्रीगोंदा तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत पक्ष आपली दखल घेणार आणि उमेदवारी आपल्यालाच मिळणार हे जगताप व त्यांच्या समर्थकांनी गृहीत धरले होते.

मात्र, तालुक्यातील एका दलालाच्या मध्यस्थीने ही जागाच महाविकास आघाडीत हायजॅक झाली. शिवसेनेचे कोठेही वर्चस्व नसताना ही जागा राष्ट्रवादीकडून काढून घेण्यात आली. हे करत असताना नगर शहरासह पारनेरमधील शिवसैनिक वाऱ्यावर सोडून देण्यात आले. शिवसैनिकांना ही कृती खटकली. दुसरीकडे श्रीगोंद्याची जागा मिळवली असली तरी स्थानिक शिवसैनिकांचा नावगडे यांना विरोध कायम आहे. प्रामाणिक भूमिकेतून राहिलेल्या जगताप यांना फसवले गेले अशी भावना आता गावागावात निर्माण झाली आहे. त्यातच स्वाभिमानी बाणा जपत विकला जाणार नाही हा त्यांनी दिलेला शब्द देखील मतदारांना भावल्याचे दिसते.

वांगदरीतील ‌‘त्या‌’ तमाशाची किंमत मोजावी लागणार!
वांगदरी हे नागवडे यांचे गाव! वांगदरी येथे काही महिन्यांपूव गावची यात्रा होती. या यात्रेच्या निमित्ताने तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तमाशा चालूू असताना गावातील तरुणांमध्ये वाद झाला. स्टेजवर नाचगाणे चालू असताना सुरू झालेला वाद सोडविण्यास गेलेल्या एका बड्या नेत्याला धक्काबुक्कीची घटना घडली. त्यातून संतापलेल्या या नेत्याने दुसऱ्या दिवशी धनगर समाजातील काही तरुणांना त्यांच्या वस्तीवर जाऊन बेदम चोप दिला. बेदम चोप दिल्याने या समाजातील तरुण मुला-बाळांसह गावातून पळून गेले. याबाबत पोलिस ठाण्यात जाण्याचे धारिष्ट्यही त्यांच्यात राहिले नाही. यानंतर घाबरुन गेलेल्या या तरुणांना काहीच चूक नसताना माफीनामा द्यावा लागला आणि मग त्यांना गावात प्रवेश मिळाला. आता विधानसभा निवडणुकीत याच धनगर समाजाची मते मागायची कशी असा प्रश्न या नेत्याला पडला असल्याचे दिसून येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...