spot_img
ब्रेकिंगजेवणाच्या बिलावरून राडा; सात आरोपीच्या पिंजऱ्यात, कुठे घडला प्रकार पहा

जेवणाच्या बिलावरून राडा; सात आरोपीच्या पिंजऱ्यात, कुठे घडला प्रकार पहा

spot_img

जामखेड | नगर सह्याद्री

येथील हॉटेलमधील जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकास सात जणांनी दगड व लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच एकाने ग ळ्यातील ५० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी घेतली व ते पसार झाले. याप्रकरणी एकूण सात जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक दत्तू जगदाळे, अमोल जगदाळे (पूर्ण नाव माहीत नाही), अजित उर्फ दादा शहाजी जगदाळे, राजेंद्र उर्फ चाचा राळेभात, गणेश उर्फ पप्पू दत्तू जगदाळे, सुरज नामदेव जगदाळे, राहुल रामनाथ जगदाळे (सर्व राहणार, जगदाळे वस्ती, जामखेड) असे आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अमोल बाजीराव खरात (वय-३९, रा. बीड रोड, जामखेड) यांचे खर्डा रोड, या ठिकाणी ‘हॉटेल निसर्ग’ आहे. गेल्या २० जून रोजी रात्री साडेदहा वाजता आरोपी दीपक दत्तू जगदाळे व अमोल जगदाळे हे दोघे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. यानंतर पावणेबारा वाजण्याच्या सुमारास दीपक व अमोल हे दोघेही फिर्यादी अमोल खरात यांच्याकडे बिल देण्यासाठी आल.

तेव्हा जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून ते फिर्यादी सोबत वाद घालू लागले. यानंतर आरोपी अमोल जगदाळे यांनी हॉटेल बाहेर येऊन इतर आरोपी साथीदारांना बोलावून घेतले. यानंतर या आरोपींनी फिर्यादीस हॉटेल बाहेर ओढत नेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा भाऊ आनंद खरात हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही आरोपीनकडून मारहाण करण्यात आली. यामध्ये फिर्यादी अमोल खरात यांच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तुटून खाली पडली. तेव्हा ती चेन अजित उर्फ दादा शहाजी जगदाळे याने उचलून घेतली व तो निघून गेला. जाताना ‘तुमच्या कडे पाहून घेतो’ अशी धमकीही दिली. या प्रकरणी एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने आलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. गावडे हे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...