नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या वैयक्तिक निवासस्थानावर कब्जा केला, तोडफोड केली आणि आग लावली. दरम्यान , या सर्वांमध्ये नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. काल रस्त्यावर उतरलेले निदर्शक सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
नेपाळमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक वळण घेतले आहे. राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या खाजगी निवासस्थानाचा ताबा घेतला, तोडफोड केली . तसेच आंदोलकांनी संसद पेटवली.
यापूर्वी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्षाचे नेते रघुवीर महासेठ आणि माओवादी अध्यक्ष प्रचंड यांच्या घरांवरही हल्ला करण्यात आला होता. गृहमंत्री रमेश लेखक, कृषीमंत्री रामनाथ अधिकारी, आरोग्यमंत्री यांच्यासह पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. वाढत्या दबावादरम्यान, पंतप्रधान ओली उपचाराच्या नावाखाली दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारत आणि नेपाळच्या दरम्यान रोटी-बेटी व्यवहार होत असतो. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्याच्या सीमा नेपाळ संलग्न आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे नातेसंबंध निर्माण झालेत. नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद केल्याने भारतीय सीमावर्ती भागांवर मोठा परिणाम झालाय. दोन्ही देशातील नागरिक आता फोनवरून साधा कॉल करून संपर्क साधत आहेत. त्यामुळे त्यांच्या खिशावर अधिकचा भार पडतोय.
नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलीय. त्याचा मोठा फटका भारताच्या सीमावर्ती भागाला बसलाय. भारत आणि नेपाळमधील लोकांना संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करता येत नाहीये. ते आता थेट साध्या फोन कॉलद्वारे संपर्क करत आहेत. पण असा फोन कॉल करणं त्यांना महागात पडत आहे. जेथे ते व्हॉटसअॅपवरून नेटच्या खर्चात संपर्क करू शकत होते. एक फोन कॉल करण्याचा खर्च आधी ८ रुपये होते तेथे आता १२ रुपये खर्च करावे लागत आहे, त्यामुळे त्याच्या खिशावर अधिक भार पडतोय.
दरम्यान उत्तर प्रदेशातील अर्धा डझन जिल्ह्यांची सीमा नेपाळशी लागून आहे. भारत-नेपाळमध्ये रोटी बेटी व्यवहार होत असतात. त्यामुळे दोन्ही देशात नागरिकांचे अनेक नातेवाईक आहेत.परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून नेपाळमध्ये अराजकता वाढत असल्यानं दोन्ही देशातील नागरिकांना आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधू शकत नाहीत.
एका वृत्त संस्थेशी बोलताना बहराइच येथील रहिवाशी दिवाकर मिश्रा यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी नेपालगंज येथील आहे. त्या सध्या माहेरी गेल्या आहेत. त्यामुळे ते आपल्या पत्नीशी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधत असायचे. पण आता साध्या फोन कॉलमुळे १२ रुपयांचा त्यांना खर्च येत आहे. त्यामुळे दोघेही कमी वेळ बोलतात. पण त्यामुळे ते चिंतेत राहत आहेत.
हीच परिस्थती नेपाळमधील लोकांची आहे. तेथील व्यापारी अजय टंडन म्हणाले की, व्यावसायामुळे भारतात कोठेही संपर्क साधायचा असतो. परंतु आता फोन करणं इतक महाग झालंय की, फोन कॉल करण्यासाठी अनेकवेळा विचार करावा लागतो. भारतातून नेपाळला फोन करण्यासाठी टॅरिफ मोबाईल ऑपरेटरनुसार, वेगवेगळे आहेत.
परंतु साधरण दर हे ८ ते १२ रुपये प्रतिमिनीट आहेत. तर बीएसएनएलचे दर १० ते १२ प्रतिमिनीट आहेत. जिओ रिलायन्सचे आयएसडी पॅकनुसार, ६.९९ रुपये प्रतिमिनीट साठी खर्च लागतो. तर वोडाफोन-आयडियाच्या नेटवर्कवरील आयएसडी कॉलसाठी १० ते १२ रुपये प्रतिमिनिट खर्च लागतोय. दरम्यान नेपाळमध्ये फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स्अॅप सारखे अनेक सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅपला बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे संतप्त तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या हिंसक आंदोलनात काठमांडूमधील १७ आणि नेपाळच्या दुसऱ्या भागातील २ जणांसह १९ जणांचा मृत्यू झालाय.