spot_img
अहमदनगरविजयाच्या उंबरठ्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; सुजयने माझ्यासाठी..

विजयाच्या उंबरठ्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; सुजयने माझ्यासाठी..

spot_img

राहता । नगर सहयाद्री:-
माझा विजय मतदारसंघातील जनतेला समर्पित आहेत. सुजयने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. खरंतर महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलात महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांना फटका बसताना दिसत आहे.

महायुतीने थेट विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. राज्याच्या निवडणुकीचे मतमोजणीत महायुतीचे २१७ उमेदवार आघाडीवर आहेत. महायुतीच्या अनेक उमेदवारांनी विजयाकडे वाटचाल केली आहे. शिर्डीतही भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत. विखे पाटील बाराव्या फेरी अखेर ३४,७९९ मतांनी आघाडीवर आहेत.

तर काँग्रेसच्या प्रभावती घोगरे पिछाडीवर आहेत. राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीवर जाताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी हस्तांदोलन करत गळाभेट घेतली.

दरम्यान, नगरमध्येही महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नगर शहर मतदारसंघात महायुतीचे संग्राम जगताप आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातही बाराव्या फेरीनंतर महायुतीचे अमोल खताळ आघाडीवर आहेत.

तर बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार काशिनात दाते आघाडीवर आहेत. आठव्या फेरीत दाते यांना ४७२५ मतांनी आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीच्या राणी लंके पिछाडीवर आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच; संगमनेर शहरातून निघणार विजयाची मिरवणूक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगरच्या १२ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास...

आमदार बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव; अमोल खताळ यांनी मारली बाजी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे....

‘हॅटट्रिक’ आमदार! संग्राम जगताप यांचा ‘इतक्या’ मतांनी विजय

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी...

अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडी पिछाडीवर; महायुतीचे ‘हे’ उमेदवार आघाडीवर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी बाकावर...