spot_img
ब्रेकिंगविधानसभेत राडा! शिंदे गटाचे 'ते' दोन आमदार ऐकमेंकाना भिडले, नेमकं कारण काय?...

विधानसभेत राडा! शिंदे गटाचे ‘ते’ दोन आमदार ऐकमेंकाना भिडले, नेमकं कारण काय? पहा..

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री
विधीमंडळाचा शुक्रवारी शेवटचा दिवस असतनाच शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाला. विधानसभेच्या लॉबीत शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहचला. त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटल्याचे बोलले जाते.

या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिसांनी विधानभवनात येऊ नये अशी प्रथा आहे. सत्ताधारी मंत्री आमदारांमध्ये हमरीतुमरी होणे धक्कादायक आहे. संस्कृती धुळीस मिळवली आहे. महेंद्र थोरवे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. विधानसभेत असं होऊ नये असं प्रामाणिक मत आहे. विधानसभेचे नावलौकीक कायम राहू द्या असं राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तर महाराष्ट्रात भाजपानं जे राजकारण उभं केले, त्यात सभागृहालाच आखाडा केलेला दिसतो. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थासाठी एकमेकांवर लॉबीत भिडले गेलेत. हे खोयाचे प्रकरण आहे. हा प्रकार लाजिरवाणा आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, दादा भुसे यांच्याशी बोललो, समज गैरसमज असतात. मतदारसंघातील काम विचारायला गेले तेव्हा चर्चा होत असते. दादा भुसे हे मंत्री आहेत. ते दिघेंपासून एकनिष्ठ आहेत. आमदार ही व्यक्तीच असते. सभागृहाच्या बाहेर घडलेल्या घटनांशी गोळीबाराशी तुलना करणे योग्य नाही. धक्काबुक्की झाली नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी काम करून द्या यासाठी आमदार आग्रही होते. ज्यावेळी असे प्रकार घडले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे असं आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...