अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकाबाहेर दोन रिक्षा चालकांत तुफान राडा झाल्याची घटना घडली. यात एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले. सोमवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला असून कोतवाली पोलीस अधीक तपास करीत आहेत.
शहरातील माळीवाडा बसस्थानकाच्या मागील बाजूस, हॉटेल फेमस समोर असलेल्या रिक्षा स्टँडवर दोन रिक्षा चालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या झटापटीतएमएच 16 बीसी 3313 या रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रिक्षा चालक मुदस्सर शेख आणि वसंत मोकाटे यांच्यात वाद झाला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी दगडांचा साठा व काचेचे तुकडे आढळून आले. वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोतवाली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.