spot_img
अहमदनगरकेडगाव परिसरात राडा! पठारे टोळीकडून जीवघेणा हल्ला; यांना ठोकल्या बेड्या

केडगाव परिसरात राडा! पठारे टोळीकडून जीवघेणा हल्ला; यांना ठोकल्या बेड्या

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शहरातील केडगाव परिसरात जागेचा वादातून भाजप पदाअधिकाऱ्यास पठारे टोळीने जीवे मारण्याच्या उददेशाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी भाजप पदाअधिकारी निलेश भाऊसाहेब सातपुते ( केडगाव, जि. ता. अहमदनगर ) यांनी कोतवाली पोलीस फिर्याद दिली आहे.

या प्ररकरणी विजय मोहण पठारे, राजेंद्र मोहन पठारे, प्रशांत बारस्कर, अजय राजु पठारे, विजय राजू पठारे, आकाश औटी, मयुर चावरे, सनी भुजबळ, राहुल झेंडे, गितेश ऊर्फ भैया पवार, राकेश टोकळ, परशुराम बुधाळे, सोनु परदेशी, आकाश सांगळे, विशाल दळवी, अंशु चव्हाण, अजय वुचाळे (सर्व रा.अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-नगर महामार्गावरील हॉटेल रंगोलीच्या पाठीमागे दि. ०९ सप्टेंबर रोजी सदरचा प्रकार घडला. फिर्यादी यांचे जागेवर बांधलेल्या अवैध्य बांधकामाबाबत दिलेल्या तक्रारी अर्जाचा राग मनात धरुन आरोपी पठारे टोळीने कट रचून जिवे ठार मारण्याचे उददेशाने घातक हत्याराने फिर्यादी यांच्यावर हल्ला केला.

तसेच तसेच गळयातील सोन्याची साखळी देखील जबरदस्तीने ओरबडून नेले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. जखमी भाजप पदाअधिकारी निलेश भाऊसाहेब सातपुते याच्यावर नगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

केडगाव बायपास रस्त्यावरील खुनी हल्ला करणारे काही तासातच गजाआड; कोतवाली पोलीसांची कारवाई
उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून चार जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री बायपास रस्त्यावर टोल नाक्याजवळ घडली होती. याप्रकणी प्रतिक विलास चव्हाण (वय २४, रा. वडगाव गुप्ता) यांच्या जबाबावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणातील आरोपींना कोतवाली पोलीसांनी काही तासातच जेरबंद केले आहे. संदिप बाळासाहेब थोरात (वय- ४२ वर्षे रा. साईनगर, भारत बेकरी मागे बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर), कार्तीक संदिप थोरात ( वय १८ वर्षे रा. साईनगर, भारत बेकरी मागे बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर),रोहित संतोष चाबुकस्वार ( वय २१ वर्षे रा. ओम स्वीट पाठीमागे भिंगारदिवे मळा, गुलमोहर रोड सावेडी ) यांना अटक करण्यात आली आहे. संदीप थोरात याने चव्हाण याला फोन करून माझा मुलगा कार्तीक हा तुझ्याकडे येईल व तुझ्या पैशाचा व तुझा हिशोब करेल असे सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात तिघे दुचाकीवरून आले व त्यांनी तू पैसे का मागतो, असे म्हणत टोळक्याने चव्हाण यांना अमानुष मारहाण करत डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सदर गुन्हयाची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दारोडे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना आरोपींचा शोध घेणेकामी सुचना देवुन रवाना केल्यानंतर अवघ्या काही तासांतच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हयातील आरोपींना जेरबंद केले आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि / विकास काळे, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार ए. पी. इनामदार, दिपक रोहकले, तानाजी पवार, सत्यम शिंदे, नकुल टिपरे, मोहन भेटे, सुजय हिवाळे, सुरज कदम, संकेत धिवर, अनुप झाडबुके, राम हंडाळ, यांच्या पथकाने केली आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...