धाराशिव / नगर सह्याद्री :
धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीमध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. मृतांमध्ये तीन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार शेतातील पाण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला.
धाराशिवमध्ये मध्यरात्री दोन गटात हाणामारी झाली. शेतामध्ये पाठी देण्यावरून दोन गटात वाद झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आलेय. धाराशिवमधील वाशी तालुक्यातील बावी पिडी येथे ही घटना घडली आहे. मारहाणीमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय. अनेकजण यामध्ये जखमी झाले आहेत. मृतामध्ये तीन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी येथील येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. येरमाळा पोलिसांनी 10 आरोपींना संशियत म्हणून ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. फक्त शेतामधील पाणी हेच वादाचे कारण आहे की दुसरं काही, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.