Business Idea: रायबरेली जिल्ह्यातील शिवगढ भागातील तरोंजा गावातील रहिवासी हेरंब दीक्षित यांनी लखनौमधील एका खासगी कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होते. कोरोनाच्या कालावधीमध्ये संपूर्ण जग ठप्प झाल्याने ते गावी परतले. पुन्हा त्याला नोकरी करावीशी वाटली नाही. त्यानंतर त्यांनी घरी स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरु केला.
पहिल्यादा त्यांनी त्यांच्या घरामधील गाई-गुरांपासून दुग्ध व्यवसायास सुरवात केली. दुग्ध व्यवसायामध्ये ते यशस्वी झाल्याने वर्षाला लाखो रुपयांची कमाई करत आहेत. दूध व्यवसाय सुरू केल्यानंतर हेरंब दीक्षित याला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले.
हा व्यवसाय स्वतःच्या हक्काचा असून यामध्ये भरपूर नफा मिळत असल्याने त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. दीक्षित हे दरवर्षी लाखो रुपये कमावत असून ते त्यांच्या व्यवसायात खूप आनंदी आहे. खाजगी कंपनीपेक्षा स्वतःच्या व्यवसायात अधिक शांतता असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.