spot_img
अहमदनगरसाईभक्तांवर काळाचा घाला; अपघातात 3 ठार, कुठे घडली घटना?

साईभक्तांवर काळाचा घाला; अपघातात 3 ठार, कुठे घडली घटना?

spot_img

शिर्डी | नगर सह्याद्री
साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना पिंपरी फाट्याजवळ कारचा अपघात झाला. मारुती स्विफ्ट कार चालकाचा वाहनावरील वरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली, त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन आदळल्याने ही अपघाताची घटना घडली. कारचा स्पीड अधिक असल्याने अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातातील मृतदेह शवविच्छदेनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देशातील रस्तेमार्गाचे विस्तारीकरण होत आहे, अनेक नवीन महामार्ग बांधले जात आहेत. त्याच तुलनेने वाहनांची संख्याही वाढत आहे.

मात्र, वाढते दळणवळण हे वाढत्या अपघातांचे कारण बनत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत खंत व्यक्त केली होती. मात्र, रस्ते अपघातात अनेकांचे जीव जात असल्याच्या दुर्दैवी घटना कमी होताना दिसून येत नाहीत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर शहरातील कार्यकर्त्‍यांना मंत्री विखे पाटलांचा महत्वाचा संदेश; तयारी सुरु करा! आता शहरात विकासाची गंगा..

संगमनेर । नगर सहयाद्री: आ.अमोल खताळ यांच्‍या विजयाने तालुक्‍यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास...

पालकमंत्रिपदावरून ताणाताणी; महायुतीत कोण-कोण नाराज?

मुंबई | नगर सह्याद्री:- महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सरकारमधील तिन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता दिसून येत...

संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे संतापले; ५ मोठ्या मागण्या कोणत्या?

बीड | नगर सह्याद्री बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात...

सावकारी टोळक्यांची दादागिरी; बंद पाडले व्यावसायिकचे दुकान, अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करुन, सातत्याने...