spot_img
ब्रेकिंगमला तुझ्या नवऱ्याच्या जागेवर धर!: विधवा वहिनीचा दिराने केला छळ, पारनेर तालुक्यातील...

मला तुझ्या नवऱ्याच्या जागेवर धर!: विधवा वहिनीचा दिराने केला छळ, पारनेर तालुक्यातील प्रकार

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
विधवा महिलेच्या दीराने भररस्त्यात मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेचा पतीचे ४ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या एका दिराने त्यांच्यावर वाईट नजर ठेवून फोन व व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली.तसेच १२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कारने पाठलाग करत दुचाकी अडवली. कारमधून उतरून जबरदस्तीने हाताला पकडून खाली ओढले व तू मला तुझ्या नवऱ्याच्या जागेवर धर” असे म्हणत लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले.

दरम्यान, दुसऱ्या दीराने तू त्याच्या सोबत राहा, तुला काही कमी पडू देणार नाही, तू त्याच्या सोबत राहिली नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...