spot_img
अहमदनगरअनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला संपवले; कोर्टाने दिली आरोपीला अशी शिक्षा

अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला संपवले; कोर्टाने दिली आरोपीला अशी शिक्षा

spot_img

मृताच्या पत्नीसह दोघे निर्दोष

जामखेड | नगर सह्याद्री

आडीच वर्षांपूर्वी खर्डा येथील विशाल सुर्वे खुन प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या तीन आरोपीं पैकी एकास श्रीगोंदा येथील जिल्हा व अति सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर मयताच्या पत्नीसह दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आपला नवरा प्रियकराच्या अनैतिक संबंधाला अडथळा ठरत आसल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने आडीच वर्षापूर्वी आपल्या नवर्‍याचा खुन केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की मयत विशाल ईश्वर सुर्वे (वय २६, रा. सुर्वे वस्ती, खर्डा ता. जामखेड) हा दि १३ मे २०२२ रोजी घराकडे जात असतांना विशालच्या डोयावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. यानंतर तात्कालिन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपास करत आसताना मयताची पत्नी व त्यांच्या नात्यातील आरोपी कृष्णा संजय सुर्वै या दोघांचे अनैतिक संबंध होते. मात्र या अनैतिक संबंधाला मयत विशाल सुर्वे हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी आरोपीची पत्नी हीने कट रचला होता. मयत विशाल सुर्वे हा त्या दिवशी काम आटोपून आपल्या घरी येत असताना विशाल ची पत्नी ही मोबाईलच्या माध्यमातून पतीच्या संपर्कात होती. विशाल रिक्षा घेऊन येत असतांना आरोपी कृष्णा सुर्वे, व त्याचा मित्र श्रीधर राम कन्हेरकर याच्या मदतीने विशाल याच्या डोयावर टणक वस्तूने मारहाण केली होती. या मारहाणीत विशालचा जागेवरच मुत्यू झाला.

याप्रकरणी आरोपी कृष्णा संजय सुर्वे, श्रीधर रामा कन्हेकर व मयत विशाल याची पत्नी अशा तिघांना पोलिसांनी अटक केली होती. आरोपीं विरोधात अडीच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू होता. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण एकवीस साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील काही साक्षीदार फुटीर झाले. परंतु फिर्यादी सुशांत सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पंच सुरेश पवार, प्रकाश गोलेकर, गोरख शिकारे, सुरेश हजारे, पवन सोनवणे, श्रीराम कुलकर्णी, हनुमंत औटी, योगेश वाळुंजकर, डॉ. संजय वाघ, साक्षीदार राजेंद्र भुमकर, तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, जामखेड पोलीस स्टेशन यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण, परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरण्यात आल्या. विशाल सुर्वे याला जीवे ठार मारल्या प्रकरणी व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी धरून आरोपीस जन्मठेप व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटांत राडा; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- रस्ताच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक ते गोपी...

‘महिलेला डंपर खाली…’; नगरमध्ये वाळू तस्करांचा धुमाकूळ!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू व गौण खनिज तस्करांचे कारनामे नेहमीच समोर येत...

बळीराजाला खुशखबर! राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ वस्तू मिळणार विनामूल्य

मुंबई | नगर सह्याद्री राज्यातील शेतकरी, घरकुल लाभाथ आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली...

महापालिकेचे उत्पन्न वाढणार; इमारती, घरांच्या बांधकाम क्षेत्राच्या नोंदीत धक्कादायक बाबी उघड

४७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण / नागरिकांनी सर्वेक्षणास आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे : आयुक्त...