मुंबई । नगर सहयाद्री
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पुष्पा द रुल या मालिकेच्या दुसऱ्या भागाची पुष्पाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांना खुशखबर असून ‘पुष्पा २’ प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन पूर्ण झाले असून आता ते चित्रपटाच्या मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करत आहेत .’पुष्पा २: द रूल’ हा ‘पुष्पा १: द राइज’ चा सिक्वेल आहे आणि तो 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
पुष्पक 2 खूप हिट होणार असून संपूर्ण भारतात आणि जगभरात प्रदर्शित होईल. हा पेन इंडिया चित्रपट असून तो इंग्रजी तसेच सर्व भारतीय भाषांमध्ये डब केला जाणार आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. डेव्हिड वॉर्नरसारख्या प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने पुष्पाच्या हुकस्टिकची नक्कल केल्याने हा चित्रपट लोकप्रिय झाला आहे.
‘पुष्पा २’ मध्ये पुष्पा राज (अल्लू अर्जुन) त्याच्या शत्रू SP भानवर सिंह शेखावत (फहद फासिल) विरुद्ध बदला घेण्यासाठी तयारी करतो. पहिल्या भागात पुष्पा राजच्या संघर्षाची कथा मांडण्यात आली होती, तर दुसऱ्या भागात त्याच्या बदला घेण्याच्या प्रवासाची कथा असेल. यात पुन्हा एकदा अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.