spot_img
महाराष्ट्रपंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज आला? कुठे बरसणार पावसाच्या सरी… वाचा...

पंजाबराव डख यांचा पावसाचा अंदाज आला? कुठे बरसणार पावसाच्या सरी… वाचा सविस्तर

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-

जुलै महिना संपत आला असून, मागील 10-12 दिवसांत पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील पाच दिवसांसाठी मराठवाड्यातील पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुढील पाच दिवसांमध्ये मराठवाड्यात कोणताही अलर्ट नसून, फक्त हलक्या सरींची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये फक्त भूरभूर पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये फारसा पाऊस होण्याची शक्यता नाही, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

मागील 10-12 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. मुंबईमध्ये पाणी साचून ‘तुंबई’ झाली, पुण्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि गडचिरोलीमध्ये अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले. नद्यांची पाणी पातळी वाढली आणि अनेक गावांत नुकसान झाले. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात 55.9% पाऊस झाला आहे.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक 66.8% पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 59.2%, जालना 57.4%, लातूर 61.2%, धाराशिव 65.5%, नांदेड 49.2%, परभणी 48.7% आणि हिंगोली 47% इतका पाऊस झाला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा मात्र केवळ 6.26% आहे, जो मागील चार-पाच दिवसांतील पावसामुळे 2% ने वाढला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रयत शिक्षण संस्थेत सुरू झाला दळवी पॅटर्न; कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

  कान्हुर पठार मधील तो विकृत शिक्षक अखेर निलंबित पारनेर / नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कान्हूर पठार,...

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...