spot_img
अहमदनगरपंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले असून, हवामान बदलाचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पडत आहे. त्यामुळे निसर्गाच्या विरोधात शेती न करता त्याच्या आधारावर शेती केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर येथे देवकृपा फाउंडेशन आणि सुजित झावरे पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून पंचायत समिती सदस्य अमोल साळवे यांनी स्व. सुखदेव साळवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील होते. यावेळी हवामान अभ्यासक पंजाबराव डख मेळाव्यात बोलत होते. १९९५ नंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे महाराष्ट्रातील पाऊस गुजरातकडे सरकल्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नमूद केले. त्यांनी

पुढे सांगितले की, बदलत्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले असून, शेतीसाठी योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. पिकांच्या लावणीपासून कापणीपर्यंत शेतकरी अथक मेहनत करतो; परंतु गारपीट, वादळी वाऱ्यांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊन निसर्गाच्या विरोधात नव्हे, तर निसर्गाशी सुसंगत शेती करावी, असा सल्ला त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

या शेतकरी मेळाव्यास जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम अण्णा खिलारी, बाळासाहेब खिलारी, भाजपा पारनेर तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी सभापती गंगाराम बेलकर, अरुणराव ठाणगे, सचिन पाटील वराळ, उद्योजक पंकज सोनवणे, डॉ. श्रीकांत पठारे, विकास (बंडू) रोहकले, दत्ता नाना पवार, चेअरमन नारायण झावरे, माजी पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, उदय साळवे, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन अॅड. बाबासाहेब खिलारी, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठुबे, उपसरपंच रामभाऊ तराळ, माजी सभापती गणेश शेळके, बाजार समितीचे संचालक शंकरराव नगरे, शिक्षक नेते प्रवीण झावरे, महिला नेत्या वंदनाताई घोलप, निजाम पटेल, खंडू भाईक, मोहन रोकडे, सोमनाथ आहेर, अशोक नऱ्हे, सुभाष वराळ, बापू तांबे, सुरेश निवडुंगे, रवींद्र पडळकर, स्वप्निल राहींज, नाना गाढवे, शरद पाटील, शंकर बर्वे, लहानु झावरे, प्रसाद झावरे, शरद गागरे, नवनाथ बिचारे, सतीश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचा उपक्रम
पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती व हवामान विषयक उपयुक्त मार्गदर्शन मिळावे, यासाठी हवामानतज्ञ पंजाबराव डख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम स्व. साळवे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथे खऱ्या अर्थाने यशस्वीपणे पार पडला.
– सुजित झावरे पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावेडीतील डॉक्टरांना तब्बल १४ कोटी ६६ लाखांना गंडवले; वाचा प्रकरण?

​अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- ​जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे, खोटे मालक उभे करून आणि...

अहिल्यानगर मधील ‘त्या’ हल्ल्याचे निलेश घायवळ कनेक्शन; ​सखोल तपासानंतर गुन्हा दाखल

​जामखेड । नगर सहयाद्री:- ​नान्नज (ता. जामखेड) येथे २४ ऑगस्ट रोजी रात्री सुनिल साळवे...

मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; आणखी एक व्हिडिओ समोर, वाचा सविस्तर

संतोष देशमुखांच्या भावाला 20 कोटी रुपयांची ऑफर बीड । नगर सहयाद्री:- मराठा आंदोलक मनोज जरांगे...

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मान जनक जागा मिळाव्यात: मंत्री नरहरी झिरवाळ

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या...