spot_img
अहमदनगरमहापालिकेतील कर्मचार्‍यांवर होणार दंडात्मक कारवाई, कारण काय? वाचा सविस्तर..

महापालिकेतील कर्मचार्‍यांवर होणार दंडात्मक कारवाई, कारण काय? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेत उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांची झाडाझडती घेत कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजताच हजर झाले.

यावेळी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी हजर होते हे पाहताच आयुक्त संतापले आणि सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत गेटवरच खुर्ची टाकून बसले. व सर्व कर्मचार्‍यांना धारेवर धरत ऑफिसचा टाईम किती आहे याची विचारणा केली.

शिपाई यांना साडेनऊ तर अधिकारी यांना पावणेदहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणे बंधनकारक असतानाही अधिकारी कर्मचारी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये येत नाही हे पाहताच आयुक्त यांचा पारा चढला व प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांची हजेरी घेत चांगलेच खडेबोल सुनावले.

उशिरा येणार्‍या कर्मचारी-अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करत दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तसेच प्रत्येक कर्मचार्‍याकडून साडे दहा वाजल्यानंतर आल्याबाबतचे कारण लेखी घेण्यात आले. यावेळी उशिरा येणारे कर्मचारी, अधिकारी, प्रभाग अधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...