सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील रूईछत्रपती फाटा ते पठारे वस्ती रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने हे काम ग्रामस्थांनी गुरुवार दि. 12 रोजी बंद पाडले होते. यानंतर कामात कुठलीही सुधारणा न करताच संबधीत ठेकेदाराने मंगळवार दि 17 रोजी हे काम पुन्हा चालू केले. हे काम पूवसारखेच निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
त्यांनी पारनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार, वाळवणे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पठारे यांना याबाबत कल्पना दिली. पवार व पठारे यांनी पुन्हा दुसऱ्यांदा कामावर जाऊन कामाची पाहणी केली असता ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ काम थांबवण्याच्या सूचना दिल्या. व नियमात काम न केल्यास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही दिला.
गेली एक वर्षापूव रूईछत्रपती फाटा ते पठारे वस्ती रस्त्याचे काम मंजूर झाले होते. मात्र ठेकेदाराच्या आडमुठेपणा मुळे हे काम उशिरा सुरू करण्यात आले. अवघ्या दोन दिवसात रस्त्यावर खडी टाकून काम उरकविण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला. दोन दिवसांपूव सुरू केलेले कामात डांबराचा कमी वापर करणे, पाणी कमी वापरणे, रोलिंग न करणे आदी तक्रारी ग्रामस्थांनी यावेळी केल्या.
शासकीय इंजिनिअरच ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप दत्ता पवार यांनी केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यासाठी निधी मंजूर झाला रस्त्याने कामही सुरू झाले मात्र ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ठेकेदाराची दंडीलशाही!
शासकीय निधी खर्च करून तो बनविण्यात येणारा रस्ता हा इस्टिमेट प्रमाणे केला जातो. यादरम्यान स्थानिक ग्रामस्थ अथवा प्रवासी यांनी काही तक्रारी केल्या तर समोरासमोर येऊन त्याचे शंका निर्सन केले जाते. परंतू रूईछत्रपती फाटा ते पठारे वस्ती रस्त्याचा ठेकेदार हा दंडीलशाहीने वागत असल्याचे दिसून आले. दि.12 डिसेंबर रोजी बंद केलेले काम कुणालाही न जुमानता त्याने दि. 17 डिसेंबर रोजी सुरू केले. हे काम देखील ग्रामस्थांनी हाणून पाडले. मग या ठेकेदाराला आश्रय कुणाचा असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.