spot_img
अहमदनगरपुण्याच्या 'त्या' प्रकरणाची नगरमध्ये पुनरावृत्ती; विजय औटीला सिव्हीलमध्ये मोबाईल आणि बिर्याणी..! किरण...

पुण्याच्या ‘त्या’ प्रकरणाची नगरमध्ये पुनरावृत्ती; विजय औटीला सिव्हीलमध्ये मोबाईल आणि बिर्याणी..! किरण काळे यांचे गंभीर आरोप

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पारनेर नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयीन कोठडीत असलेले माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी याचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आलिशान मुक्काम सुरू असल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते किरण काळे यांनी उघडकीस आणला.

आरोपीची शाही बडदास्त सुरू असल्याची माहिती समजताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह यावेळी त्यांनी थेट सिव्हील हॉस्पिटल गाठले. मंगळवारी कार्यकर्त्यांसह काळे दाखल झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाच्या सीएमओ यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला.

दरम्यान याची कुणकुण लागतातच ड्युटीवर असणार्‍या पोलिसांनी खाजगी गाड्यांची व्यवस्था करत अवघ्या दहा मिनिटांत आरोपी औटीला मागच्या दाराने गाडीत घालत रुग्णालयातून रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी पोबारा केला. औटीला पळवून लावण्याचा ड्युटीवरील पोलीस कर्मचार्‍यांचा डाव होता, असा गंभीर आरोप काळे यांनी यावेळी केला.

यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे आदींसह मविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रात्रीतून व्हाया पारनेर ग्रामीण रुग्णालयात ते सबजेल प्रवास
किरण काळे मविआ कार्यकर्त्यांसह सिव्हीलमध्ये दाखल झाल्याचे कळताच पडद्यामागून सूत्रे वेगवान हलली. रात्रीतून व्हाया पारनेर ग्रामीण रुग्णालयात ते सबजेल प्रवास करण्यात आला. आलिशान, महागड्या खाजगी गाड्या रुग्णालयात बोलविल्या गेल्या होत्या. त्यानंतर काहीच वेळात रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी आरोपी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याला ऍडमिट करून घेतले गेले नाही. त्याने तिथे देखील आपले पोट दुखत असल्याचे तक्रार केली. शेवटी त्याला पोलिसांनी पारनेरच्या सबजेलमध्ये रात्रीच्या अंधारात दाखल केले असल्याचा आरोप काळे यांनी केला.

दोषींवर कठोर कारवाई करा
महाविकास आघाडीने, जिल्हा शासकीय रुग्णालय, ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारी, पारनेर तहसीलदार, पारनेर सबजेल प्रशासन यांच्या संगनमतातून भाजप प्रणित सरकार कडून आरोपीला दिल्या गेलेल्या या आलिशान शाही, बढधास्तीच्या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी किरण काळे यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...