spot_img
ब्रेकिंगप्रेमाच्या जाळ्यात ओढले, पुढे नको तेच घडले! अहिल्यानगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, पुढे नको तेच घडले! अहिल्यानगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार

spot_img

बीडमधून महिलेचे तीन साथीदार जेरबंद | महिला फरार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
प्रेमाच्या जाळ्यात ओढून मित्रांच्या मदतीने एकास लुटल्याची घटना एमआयडीसी परिसरात घडली होती. याप्रकरणी महिलेच्या तीन साथीदारांना बीड मधून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये मयुर मधुकर ढोले (वय 27, रा.सुयोग अपार्टमेंट, शिवाजीनगर, बीड), अभिजीत शंकर गलधर (वय 27, रा.सिध्देश्वर, एमआयडीसी बीड), नितीन स्वामी डांगरे (वय 26, रा.बुरूडगल्ली, हिरालाल चौक, बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हकिगत अशी की, 24 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी सुरेंद्र विश्वासराव पिंपरकर (रा.पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) व त्यांची मैत्रीण प्रियंका पांडुरंग ढलपे (रा.बीड) असे एमआयडीसी परिसरात असताना 3 अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीस मारहाण करून एक लाख रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. तसेच फिर्यादीचे व त्यांचे मैत्रिणीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन, पैशाची मागणी केली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खंडणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

सदरील गुन्ह्याचा तपासकामी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार संदीप पवार, सुरेश माळी, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमुन आरोपीचा शोध घेण्यासा सांगितले. 27 जानेवारी 2025 रोजी पथक तांत्रिक विलेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना पथकास सदरचा गुन्हा हा मयुर ढोले (रा.बीड) याने त्याचे साथीदारासह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचत मयुर मधुकर ढोले, अभिजीत शंकर गलधर, नितीन स्वामी डांगरे या तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा प्रियंका पांडुरंग ढलपे (रा.बीड (फरार) हिचे मदतीने केल्याचे सांगितले. आरोपीस गुन्हयाचे तपासकामी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधीकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...

एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून अचानक दिल्लीला रवाना; कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा...

श्रीगोंद्यात मंदिरांची विटंबना! दारु पिऊन उच्छाद, समाजकंटकांची हातात कोयते, गज घेऊन दहशत..

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील काष्टी गावातील काही समाजकंटकांकडून मद्यपान करून ग्रामदेवतांच्या मंदिरांची विटंबना होत...