spot_img
अहमदनगरकबड्डीच्या मैदानावर आमदार शिंदेंच्या खासदार विखेंना जाहीर शुभेच्छा! नाराजीचे कारण नंतर सांगणार?

कबड्डीच्या मैदानावर आमदार शिंदेंच्या खासदार विखेंना जाहीर शुभेच्छा! नाराजीचे कारण नंतर सांगणार?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान भाजपाच्या अतंर्गत वादामुळे नाराज असलेले आमदार राम शिंदे यांनी मागील पाच वर्षात घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्यांवर होती हे स्पष्ट करणार असल्याचे प्रतिपादन केले.

आमदार राम शिंदे यांनी नगरच्या वाडिया पार्कमध्ये आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरु असलेल्या मैदानावर सामने पाहण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

आमदार शिंदे म्हणाले, नगर दक्षिणेतून उमेदवारीसाठी मीही इच्छुक होतो, याआधीही दोन निवडणुकांच्या काळात मी इच्छुक होतो. मात्र, आता डॉ. विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कोणत्या निकषावर मला उमेदवारी मिळाली नाही, हे मला सांगता येणार नाही. मात्र डॉ. विखेंना उमेदवारी मिळाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

पुढे बोलतांना आमदार शिंदे म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही माझ्याशी चर्चा केली. त्या चर्चेत मी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्यांच्या अनुषंगाने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतल्याचे समजले. मात्र, फडणवीस यांच्याकडून मला अजूनपर्यंत निरोप नाही, पण नाराजी संदर्भात मी उपस्थित केलेल्या मुद्यांवर फडणवीस यांच्या स्तरावरच चर्चा होईल. त्यानंतर ते मुद्दे काय होते ते मी स्पष्ट करेल असेही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...