अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टींग क्रीडा प्रकारात 100 किलो वजनी गटात पीएसआय गणेश चोभे यांस सुवर्ण पदक मिळविले. सुवर्णपदक मिळविल्याबद्दल पीएसआय चोभे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 ठाणे येथे दि. 19 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 पर्यंत पार पडली. वेटलिफ्टींग क्रीडा प्रकारामध्ये 100 किलो वजन गटात चोभे यांनी सुवर्ण पदक मिळविले. यापूर्वी 2024 मध्ये 34 वी क्रीडा स्पर्धा नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेतही वेटलिफ्टींगमध्ये सुवर्ण पदक मिळविले होते. 2023 मध्ये जळगाव येथे कार्यरत असतांना विशेष शौर्य पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी अनेक पदके मिळविली आहेत. सध्या नाशिक पोलीस आयुक्तालय येथे ते कार्यरत आहे. पीएसआय गणेश चोभे यांनी सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल आमदार संग्राम जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्यासह बाबुड बेंद ग्रामस्थांनी अभिनंदन केले.