spot_img
अहमदनगरपावसामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, तूर कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या आशा पाण्यात गेल्या. विशेषतः शेवगांव तालुयातील खामगांव, हिंगणगांव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुयातील अनेक गावांतील शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खा. लंके यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे की, शेतकर्‍यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत.

यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात खा. लंके यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकर्‍यांना त्वरीत नुकसानरपाई मिळावी. शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लावरे तो व्हिडिओने घुलेवाडी षडयंत्राचा पर्दाफाश; माजी मंत्री थोरात म्हणाले, आता बंदोबस्त कर..

संगमनेर ।नगर सहयाद्री:- राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम...

चौकशी अहवालातून पर्दाफाश; अहिल्यानगर मधील ‘ती’ शाळा बनावट

राहाता | नगर सह्याद्री:- शिर्डी (ता. राहाता) इकरा उर्दू शाळा, पुनमनगर येथील चार शिक्षकांना सन...

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांची चौकशी करा; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कोणी केली मागणी?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अल्पसंख्याक संस्थांकडून पाठविण्यात येणार्‍या शिक्षणसेवकांच्या प्रस्तावांना जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर...

मुख्यमंत्र्यांना धाडली नोटीस! संदीप थोरातसह संचालकांवर कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करणार; कोणी दिला इशारा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड, अहिल्यानगर या संस्थेचे चेअरमन संदिप सुधाकर थोरात...