spot_img
अहमदनगरअहमदनगरकरांसाठी अभिमानस्पद ! नगरच्या पै.सुदर्शन कोतकर यांची 'खेलो इंडिया'त निवड

अहमदनगरकरांसाठी अभिमानस्पद ! नगरच्या पै.सुदर्शन कोतकर यांची ‘खेलो इंडिया’त निवड

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : चंदिगढ येथे पार पडलेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी रेसलिंग चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये पै. सुदर्शन महादेव कोतकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. त्यांची आता खेलो इंडिया या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अहमदनगरकरांसाठी ही बाब अभिमानस्पद असून अहमदनगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी रेसलिंग चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा चंदिगड येथे पार पडल्या.

१२५ किलो वजन गटात सुदर्शन कोतकर याने नैपुण्य दाखवले. यात त्याने तृतीय क्रमांक पटकवला. मागे झालेल्या ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत त्याने यश मिळवले होते. त्याला ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’ हा किताब मिळाला होता.

तसेच नुकत्याच पार पडलेल्या पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीही कोतकर यांची निवड झाली होती. यात त्यांनी कास्यपदक पटकावले होते. अहमदनगर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत त्याने गादी गटातून श्रीगोंदा येथील तुषार सोनवणे याच्याशी अटीतटीची अंतिम लढत देऊन विजय मिळवला होता.

आता ऑल इंडिया युनिव्हर्सिटी रेसलिंग चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्याने त्यांचे आता सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...