अहमदनगर | नगर सह्याद्री:-
देशाचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका मुलाखतीत आम्ही जर सत्तेत आल्यावर एससी एसटी वर्गाचे आरक्षण समाप्त करू असे वक्तव्य केले. वास्तविक लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यानंतर घटना बदलून या वर्गाचे आरक्षण रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस पक्ष व त्यांच्या सहकारी पक्षाने केला व मतदारांमध्ये या संदर्भात नकारात्मकता पसरवली. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जे विधान केले त्याचा निषेध म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपा अनुसुचित जाती जमाती व ओबीसी मोर्चाच्या वतीने निदर्शने करुन आंदोलनात करण्यात आले.
आंदोलनात भाजप शहरजिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, दिलीप भालसिंग, जेष्ठ नेते वसंत लोढा, भानुदास बेरड, बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी, प्रशांत मुथ्था, पंडित वाघमारे, सविता कोटा, प्रिया जानवे, संध्या पावसे, वनिता बिडवे, अजय चितळे, मनोज दुल्लम, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, गोपाल वर्मा, बाबासाहेब सानप, अॅड. चंदन बारटक्के, अमोल निस्ताने, बंटी डापसे, राजेंद्र फुलारे, नितीन शेलार, सुनील उमाप, सत्यशिला खराडे, सचिन पळशीकर, यासिम शेख, ज्ञानेश्वर धिरडे, भानुदास बनकर, संतोष हजारे, सुनिल तावरे, किशोर रायमोकर, गणेश कानगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी भाजप शहरजिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर म्हणाले की, सत्तेवर आल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांना दिलेले आरक्षण रद्द करु असे म्हणणारे काँग्रेसेचे राहुल गांधी धिक्कार असून काँग्रेस हा पक्ष आरक्षण विरोधी असल्याचे आता दिसून येत आहे. काँग्रेसने मुस्लिम विद्यापीठात एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला आरक्षण का नाकारले हे ही जाणून घेण्याची गरज आहे.