spot_img
ब्रेकिंगसीएसएमटी स्थानकात आंदोलकांचा गोंधळ!, लोकल अडवली, पुढे नेमकं काय घडलं?

सीएसएमटी स्थानकात आंदोलकांचा गोंधळ!, लोकल अडवली, पुढे नेमकं काय घडलं?

spot_img

रुळावर उतरून लोकल अडवली | चौथ्या दिवशी आंदोलन तीव्र
मुंबई | नगर सह्याद्री
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलनाचा सोमवारी चौथा दिवस. आझाद मैदानासह मुंबईतील विविध भागांत मराठा आंदोलकांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं. एक मराठा लाख मराठा आंदोलकांच्या अशा घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला. तर काही आंदोलक सीएसएमटी स्थानकावर तळ ठोकून बसले आहेत. यावेळी काहींनी सीएसएमटी स्थानकावरील रूळावर जाऊन ठिय्या मांडला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या 3 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. सीएसएमटी स्थानकावरही मराठा आंदोलक ठाण मांडून बसले आहेत. सोमवारी मराठा आंदोलकांचं आक्रमक रूप पाहायला मिळालं.मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर लोकलच्या केबिनमध्ये घुसून पोस्टर लावले. तसेच लोकलच्या लोको पायलटच्या केबिनमध्येही घुसले.

आंदोलकांना झटका! हायकोर्टात याचिका
मुंबईत गोंधळ घालणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठा झटका बसला आहे. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. नागरिकांना त्रास होत असल्याचे देखील याचिकेत म्हंटले आहे. आजच याचिकेवर सुनावणी होणार आहे. एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, यापूवच मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. कोर्टानं सदावर्तेंच्या बाजून निर्णय देत. मुंबईतील आंदोलनाला मनाई केली. तसेच नवी मुंबईतील आंदोलनासाठीही परवानगी घ्यावी लागणार असल्याचं सदावर्ते म्हणाल होते. जरांगेंनी कोर्टाचा आदेश मानला नाही तर कोर्टाचा अवमान होईल. कोर्टाच्या आदेशाविरोधात जरांगे काहीही करु शकत नाही असं याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटल होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जरांगेंसह मराठ्यांच्या रोषाचे धनी देवेंद्र फडणवीस?

आंदोलनाची व्याप्ती वाढत चालल्याने देवाभाऊंसह गृहखात्याची संपूर्ण यंत्रणा सपशेल अपयशी | जरांगे पाटलांची मुख्य...

‘आंदोलनाला परवानगी दिलीच कशी?’ हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, कोर्टात नेमकं काय घडलं? दिला मोठा आदेश

मुंबई / नगर सह्याद्री - Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज...

आंदोलनावर तोडगा न निघाल्यास…; पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..

पारनेर | नगर सह्याद्री मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते...

मनोज जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल; सावेडीकरांची गर्जना, सरकारला दिला इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकासह...