spot_img
अहमदनगरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मालवण घटनेचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मालवण घटनेचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटनेचा निषेध करून उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी सहकार महर्षी नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, अंकुशराव गर्जे, कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, राहुरी तालुका अध्यक्ष दिलीप जठार, नगर तालुका अध्यक्ष अशोक कोकाटे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुभाष काका शिंदे, आबासाहेब डंबरे, साईनाथ भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजकोट किल्यावर उभारण्यात आलेला मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन मनाला संताप आणणारी घटना आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करित आहोत. या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुध्द अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये उलथापालथ; उपमुख्यमंत्री पारनेरमध्ये; कोण कोण करणार प्रवेश पहा

पदाधिकार्‍यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश पारनेर / नगर...

किरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था काय म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपल्याचा उबाठाचे किरण काळे यांनी केलेला...

अतिवृष्टीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा, कुठे केली पाहणी पहा

ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला सविस्तर आढावा अहिल्यानगर / नगर सह्याद्री जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या...

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पावणेतीन लाखांचा गंडा;

माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'अंतर्गत सोलर पॅनल...